वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक

वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक

अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक झाली असून, अकोल्यात मात्र सरासरीही अद्याप गाठलेली नाही. वाशीम जिल्ह्यात सरासरी क्षेत्र लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. या भागात अडीच लाख हेक्टरवर सर्वाधिक हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्याचे रब्बी सरासरी क्षेत्र एक लाख ५७ हजार ७६० हेक्टर असताना प्रत्यक्षातील लागवड दोन लाख ९१८० हेक्टरवर झाली. सरासरीच्या १३३ टक्के हे लागवड क्षेत्र आहे. बुलडाण्यात हरभऱ्याचे सर्वाधिक एक लाख ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली. अकोल्यात ६४ हजार ९५७ आणि वाशीम जिल्ह्यात ५७ हजार ८७४ हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होऊ शकली. या विभागात गव्हाचे क्षेत्रही तीन जिल्हे मिळून एक लाख हेक्टरपर्यंत पोचले आहे. मक्याची लागवड घटली लष्करी अळीच्या धास्तीमुळे मका पिकाचे क्षेत्र या वेळी कमी झाल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने गेल्या काही वर्षांत रब्बी मक्याचे हब म्हणून बुलडाणा जिल्हा समोर आला होता. याला मागील वर्षात आलेल्या लष्करी अळीची झळ बसली. जिल्ह्यात रब्बीत १७ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असताना यंदा मक्याची ११ हजार हेक्टरपर्यंत लागवड पोचू शकली आहे. यातही घाटावरील चिखली, मोताळा, बुलडाणा, मलकापूर, देऊळगावराजा या तालुक्यांचे क्षेत्र अधिक आहे. लागवडीत जवळपास सहा हजार हेक्टरची घट दिसत आहे. अकोला २७ हेक्टर, वाशीम जिल्ह्यांत १३६ हेक्टर अशी जेमतेम लागवड झाली आहे.  जिल्ह्यानिहाय झालेली लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये) 

जिल्हा  सरासरी क्षेत्र लागवड टक्केवारी 
बुलडाणा १५७७६० २०९१८३ १३३
अकोला १११६५६  ८१६७२ ७३
वाशीम ९२९९५ ९१४८५ ९८

पीकनिहाय लागवडीखालील क्षेत्र (हेक्टरमध्ये) 

पीक बुलडाणा अकोला वाशीम
गहू    ५२४८९  १५९६५  ३२०६३
मका   १०५४०  २७   १३६
हरभरा   १३४८४८  ६४९५७  ५७८७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com