सांगली कृषी महोत्सवात सेंद्रिय उत्पादनांना सर्वाधिक मागणी

सांगली कृषी महोत्सवात सेंद्रिय उत्पादनांना सर्वाधिक मागणी
सांगली कृषी महोत्सवात सेंद्रिय उत्पादनांना सर्वाधिक मागणी

सांगली कृषी महोत्सवात सेंद्रिय उत्पादनांना सर्वाधिक मागणी इस्लामपूर, जि. सांगली ः येथील पोलिस कवायत मैदानावर जिल्हा कृषी महोत्सव पार पडला. यामध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहभाग असलेल्या या महोत्सवात पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या स्वयंसहायता गटांची संख्या लक्षणीय दिसली. सेंद्रिय उत्पादने या कृषी महोत्सवाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. सेंद्रिय शेतीला भविष्यात ‘सोन्याचे दिवस’ येतील, असे दिसत आहे. असे शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

कृषी महोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले गटांचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्य शासनाच्या सेंद्रिय शेतीबाबतच्या योजना सांगली जिल्ह्यात यशस्वीपणे राबत असल्याचे या कृषी महोत्सवात दिसून आले. शिराळा, खानापूर, वाळवा, कडेगाव, विटा, मिरज, पलूस आदी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांनी स्वयंसहायता गट स्थापन करून उत्पादित केलेला माल येथे विक्रीस ठेवला. त्यात प्रामुख्याने गूळ, काकवी, गूळ पावडर या पदार्थांच्या स्टॉल्सबरोबरच वांगी, कोबी, प्लॉवर, मेथी, कोथिंबीर, मिरची, गहू, तांदूळ, बाजरी, शेंगा आदींचाही समावेश होता. 

रासायनिक औषधांचा वापर न करता नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून ही उत्पादने तयार केली जातात. तसेच, कंट्रोल रिपॅकिंग करून परदेशातही पाठवली जात असल्याचे शेतकरी गटांकडून सांगण्यात आले. त्या गटांना कंट्रोल युनियन ऑफ सर्टिफिकेशनतर्फे मान्यता मिळाली आहे. त्यामुळे १०० टक्के सेंद्रिय उत्पादन असल्याची खात्री ग्राहकांना मिळत आहे. 

सेंद्रिय उत्पादने दर 
गूळ ८० रुपये किलो
काकवी २०० रुपये लिटर
गूळ पावडर १२० रुपये किलो
हरभराडाळ ६० रुपये किलो

सेंद्रिय गूळ ८० रुपये किलो, तर काकवी १०० रुपये अर्धा लिटर दराने विक्री केली जाते. उसाचा उत्पादनखर्च, गुऱ्हाळाचा खर्च आदी सारा खर्च वजा जाऊन एका किलोमागे ५० रुपये इतका घसघशीत नफा मला व माझ्या गटातील शेतकऱ्यांना मिळत  आहे.  - सुभाष पाटील, श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गट, ठाणापुढे (ता. वाळवा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com