जालन्यात तुरीची सर्वाधिक आवक

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात पांढऱ्या तुरीची आवक सर्वाधिक राहिली. लाल तुरीचीही जवळपास ४६९ क्‍विंटल आवक झाली. तर काळ्या तुरीचीही दोन वेळा मिळून २२ क्‍विंटल आवक झाली.
 The highest inflow of trumpets in Jalna
The highest inflow of trumpets in Jalna

जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात पांढऱ्या तुरीची आवक सर्वाधिक राहिली. लाल तुरीचीही जवळपास ४६९ क्‍विंटल आवक झाली. तर काळ्या तुरीचीही दोन वेळा मिळून २२ क्‍विंटल आवक झाली.

जालना समितीमध्ये २७ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ दरम्यान पांढऱ्या तुरीची सर्वाधिक २०८८० क्‍विंटल आवक झाली. ३९०५ ते ५१०९ क्‍विंटल आवक झालेल्या या तुरीला सरासरी ५९०० ते ५९५० क्‍विंटलचा दर मिळाला. लाल तुरीची ४६९ क्‍विंटल आवक झाली. या तुरीचे सरासरी दर ५४०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

एकवेळ १० क्‍विंटल व एकवेळ १२ क्‍विंटल मिळून २२ क्‍विंटल काळ्या तुरीची आवक राहिली. तिला सरासरी ५१४९ ते ५३०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बाजरीची आवक ३४४ क्‍विंटल झाली. ४२ ते ७६ क्‍विंटल आवक झालेल्या बाजरीला सरासरी १८७० ते २४१४ क्‍विंटलचे दर मिळाले. 

उडदाची एकूण आवक ११७ क्‍विंटल झाली. १ ते ४० क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या उडदाला सरासरी २५०० ते ४८०० रूपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाले. हरभऱ्याची आवक ४८५ क्‍विंटल झाली. ३९ ते १४६ क्‍विंटल आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ३७०० ते ४१०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मुगाची आवक १६८ क्‍विंटल झाली. ४ ते ५२ क्‍विंटल आवक झालेल्या मुगाला सरासरी ५१५० ते ६८०० रूपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. 

मक्याची एकूण आवक ३९१८ क्‍विंटल झाली. १५०० ते १५७१ रूपये प्रतिक्‍विंटल दरम्यान सरासरी दर मिळालेल्या मक्याची आवक ३१८ ते ९२६ क्‍विंटल राहिली. सोयाबीनची एकूण आवक १४७२९ क्‍विंटल झाली. २००३ ते ३९०५ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे सरासरी दर ५९०० ते ६००० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. सूर्यफुलाचेही आठवडाभरात तीन वेळा मिळून ५५ क्‍विंटल आवक झाली. ६ ते ४० क्‍विंटल आवक झालेल्या सूर्यफुलाचे सरासरी दर ४३०० ते ५०५० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com