संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची उच्चांकी आवक

संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची उच्चांकी आवक
संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची उच्चांकी आवक

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येवर मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. त्या तुलनेत भाज्यांना जास्त मागणी आहे. त्यामुळे भेंडी, हिरवी मिरची, पापडी, वांगी, सिमला मिरची, वालवर, भुईमूग शेंग, मटार आणि पावटाच्या भावात सुमारे दहा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

दर वर्षी भोगीच्या कालावधीत भाज्यांना जास्त भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी या कालावधीत माल आणणे पसंत करीत असतात. त्यानुसार रविवारी बाजारात भाज्यांची मोठी म्हणजे तब्बल २५० ट्रक आवक झाली आहे. बाजार समिती प्रशासनानेही शनिवारी (ता. १२) रात्री ९ वाजेपासून आडत्यांना माल विकण्यास परवानगी दिली होती. शेतकऱ्यांना नेहमीच्या तुलनेत चांगला भाव मिळाल्याचे विलास भुजबळ यांनी सांगितले. 

रविवारी येथील बाजारात कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून दहा ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून चार ते पाच टेम्पो शेवगा, राजस्थान येथून १७ ते १८ ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून ३० ट्रक मटार, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १२०० ते १३०० पोती, टॉमेटो साडेतीन ते चार हजार पेटी, फ्लॉवर दहा ते १२ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ७ ते ९ टेम्पो, गवार ३ ते ४, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, भुईमूग २०० ते २५० पोती, तांबडा भोपळा १० ते १२ , कांदा १२० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची ४० ते ४५ ट्रक इतकी आवक झाली.

मार्केट यार्डातील फळबाजारात फळांची घटलेली आवक कायम आहे. दरम्यान, संक्रांतीमुळे चेकनट व चमेली बोरांना मागणी वाढली आहे. त्यातुलनेत बाजारात कमी प्रमाणात माल दाखल होत असल्याने भावात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी बाजारात द्राक्षांचीही मोठी आवक झाली. मात्र, सणासुदीमुळे मागणी नसल्याने भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून, भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : जुना ३०-५०, नवा ६०-८०, बटाटा : ७०-१४०, लसूण : २००-३००, आले : सातारी ५५०-६००, भेंडी : ३५०-४००, गवार : ५००-६००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३५०-४००, दुधी भोपळा : ८०-१५०, चवळी : २५०-३००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ८०-१२०, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००, शेवगा : ३५०-४५०, गाजर : १२०-१३०, वालवर : ३००-४००, बीट : १००-१२०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३२०, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : परराज्य २००-२८०, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ८००-१४००, मेथी : ३००-५००, शेपू : ५०००-७००, कांदापात : ५००-७००, चाकवत : ६००-७००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-८००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ५००-६००, हरभरा गड्डी : ८००-१२००.

रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस ९ ट्रक, मोसंबी ५० टन, संत्री १ टन, डाळिंब १०० ते १५० टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे चार ते पाच हजार गोणी, चिक्कू एक हजार पाचशे डाग, पेरू तीन ते साडेतीन टन, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज १० ते १५ टेम्पो, सफरचंद ५ ते ६ हजार पेटी, बोरे १२०० ते १३०० गोणी आणि द्राक्षांची ४० टन आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-४५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १६०-२८०, (४ डझन ) : ८०-१४०, संत्रा : (३ डझन) : १६०-२८०, (४ डझन) : ८०-१४०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-५००, सफरचंद : सिमला (२० किलो) १०००-१६००, किन्नोर (२५ किलो) २०००-२५००, काश्मीर डेलीशिअस (१५ किलो) ८००-१३००, महाराजा (१५ किलो) ४००-६००, संत्री : किन्नू (१० किलो ) २२५-२५०, बोरे : चेकनट (१० किलो) ७००-७५०, उमराण (१० किलो) ६०-७०, चमेली (१० किलो) २७०-३००, चण्यामण्या ४५०. द्राक्षे : तास-ए-गणेश (१५ किलो) ७००-८००, जम्बो (१० किलो) ६००-१०००, सुपर सोनाका (१५ किलो) ८००-१२००, शरद (१५ किलो) ८००-११००, माणिकचमन (१५ किलो) ५००-८००, स्ट्रॉबेरी : १००-२५०.

सर्वच फुलांची आवक वाढली कोकणात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमावेळी आॅस्टरचे फूल देण्याची पद्धत आहे. त्यामुळे तेथून मार्केट यार्डातील फूल बाजारात आॅस्टर खरेदी करण्यासाठी खरेदीदार मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे आॅस्टरच्या भावात सुमारे १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वमीवर सर्वच फुलांची आवक वाढली आहे. विशेषत: मोगऱ्याला मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ८०-१२०, बिजली : ३०-५०, कापरी : २०-५०, कागडा : १३००, मोगरा : १३००, ॲस्टर : १५-२५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लीली बंडल : ६-१०, जर्बेरा - ३०-५०, कार्नेशियन : ५०-१००, शेवंती : ५० -११०.

मासळीला मागणी वाढली; दरही तेजीत  सध्या थंडीच्या कडाक्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. मार्गशीर्ष महिना संपला असून, थंडीमुळे सर्वप्रकारच्या मासळीला मागणी वाढली आहे. त्यामुळे बहुतांश मासळींच्या दरात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे अंड्यांना मागणी वाढल्याने अंडी गावरान अंड्यांच्या शेकडा दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून, इंग्लिश अंड्यांच्या शेकडा दरात ६ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मटण आणि चिकनचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील घाऊक बाजारात रविवारी (दि. १३) खोल समुद्रातील मासळीची ८ ते १० टन, खाडीची मासळी २०० ते ३००, नदीच्या मासळीची ८०० - ९०० किलो इतकी आवक झाली. तर, आंध्र प्रदेशातील रहू, कतला, सीलन आदी मासळीची सुमारे १० ते १२ टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी आणि चिकन, अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी यांनी दिली.

मासळीचे दर पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १५००-१६००, मध्यम : ९५०-१०००, लहान : ७५०-८००, भिला : ४००-४५०, हलवा : ५५०-६००, सुरमई : ६००-६५०, रावस-लहान : ६००-६५०, मोठे ७५०, घोळ : ६५०, करली : २८०- ३२०, करंदी (सोललेली) : २८०, भिंग ४००, पाला : लहान - ६०० -७०० मोठा - १०००-१२००, वाम : पिवळी ५५०-७५०, काळी ३६०, ओले बोंबील : १२०-१६०. कोळंबी : लहान : ३६०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स : १४००- १५००, किंगप्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-२८०, मांदेली : १०० - १२०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : २४०-२८०, खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी २००, नगली : २८०-५५०, तांबोशी ४००, पालू : २८०, लेपा : १६०-२८०, शेवटे : २४०, बांगडा : लहान १४०- १६०, मोठा २२०-२४०, पेडवी : ६०- ८०, बेळुंजी : १००-१६०, तिस-या : २००, तारली : १२०-१६०. नदीची मासळी : रहू: १६०- १८०, कतला : १६०-२००, मरळ : २८०, 

शिवडा : २००, खवली : २००, आम्ळी : १०० खेकडे : २४०-२८०, वाम : ५५०.  मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.  चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ८१०, डझन : १०८ प्रतिनग : ९, इंग्लिश : शेकडा : ४९० डझन : ६६ प्रतिनग : ५.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com