Agriculture news in marathi The highest rate could get to Raisins in Sangli? | Agrowon

सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

दिवाळीनंतरच्या सौद्यात बेदाण्याला चांगले दर मिळाले आहेत. पुढेही चांगले दर मिळतील, अशी आशा आहे.
- दिनकर पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली

सांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार समितीमध्ये बेदाणा सौद्यांना प्रारंभ झाला. या सौद्यात २१५ रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी भाव मिळाला. ५० गाड्यांतून पाचशे टन बेदाणा आवक झाली होती. सरासरी दर २० रुपयांनी वाढला असल्याचे दिसून आले. 

दिवाळीच्या सुटीमध्ये बेदाणा सौदे बंद होते. सुटीनंतर मुहूर्तावर हळद व गुळाच्या सौद्यांना नुकताच प्रारंभ झाला होता. त्यामुळे दिवाळी सुटीनंतरच्या सांगलीतील सौद्यामध्ये बेदाण्याला किती दर मिळतो? याकडे शेतकरी, व्यापारी वर्गाचे लक्ष लागले होते. बुधवारी (ता. २०) बेदाणा सौद्यात तब्बल पाचशे टनांची आवक झाली होती. दुपारी सौद्यांना प्रारंभ झाला. त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत सौदे चालू होते. 

प्रशांत मजलेकर यांच्या दुकानातील श्री. पद्मन या शेतकऱ्यांच्या ५० बॉक्‍सच्या बेदाण्याला प्रतिकिलो २१५ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. नंदी कृष्णा ट्रेडर्सचे अमित पटेल यांनी तो खरेदी केला. 
चांगल्या प्रतिच्या हिरव्या बेदाण्यास १६० ते २१० रुपये तर मध्यम प्रतिच्या हिरव्या बेदाण्यास १२० ते १६० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. काळा बेदाण्याचा दर वाढला असून ७० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. पहिल्याच बेदाणा सौद्यात सरासरी २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सौद्यासाठी व्यापारी मनोज मालू, नितीन अटल, नितीन मर्दा, पणू सारडा, अस्की सावकार, गगन अग्रवाल, रुपेश पारेख, विनायक हिंगमिरे, मुकेश केसरी, वृषभ शेडबाळे, विनोद कबाडे, जितू शेटे, हिरेन पटेल, अजित मगदूम, तुषार शहा, नीलेश मालू बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, के. एन. दरुरे, प्रशांत कदम आदींसह शेतकरी उपस्थित होते.


इतर बाजारभाव बातम्या
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
परभणीत गाजर १८०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये...सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटोची आवक वाढतीचकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...