कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला आत्मविश्वास
नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावाला शाश्वत विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासोबतच व्यायामशाळेची उभारणी केली आहे.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावाला शाश्वत विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील युवकांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा याकरिता गावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासोबतच व्यायामशाळेची उभारणी केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव एक छोटेसे गाव. लोकसंख्या अवघी १५००च्या घरात. मोहगाव, सावंगी व वाढोडा, अशी तीन गावे मिळून मोहगाव येथे गट ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. २०१८मध्ये येथे ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. सरपंचपदाची जागा सर्वसामान्य महिलेसाठी राखीव होती. विशेष म्हणजे सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार होता. दिपालीने निवडणुकीत उडी घेतली. गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी पटवून दिले.
ग्रामस्थांनीही तिच्यावर विश्वास दाखवला अन् एम.ए. डीएड असलेल्या दीपाली भरघोस मताधिक्याने निवडून आल्या. मोठ-मोठ्यांना पराभवाचा धक्का देत दीपाली वऱ्हाडे सरपंच म्हणून विराजमान झाल्या.
विकासासाठी सर्वांना घेतले सोबत
गावाचा विकास करण्यासाठी राजकीय मंडळींना सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली. प्रथम गाव हागणदारीमुक्त केले. दोन हजार वृक्षांची लागवड केली. आठवड्यातून एकदा ग्राम स्वच्छता, कचऱ्याचे योग नियोजन, लोकवर्गणीतून वाचनालय, व्यायामशाळा तयार केली. पाणीटंचाई असल्याने विहीर खोलीकरणासाठी आमदार निधीतून वेगळा निधी उपलब्ध करून घेतला. पुढील काळात सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना लोकसहभाग वाढवून पर्यावरणपूरक विकास कामांसह जलसंधारणाच्या कामावर भर देणार असल्याची माहिती सरपंच दीपाली वऱ्हाडे यांनी दिली.
- दीपाली वऱ्हाडे,
९११२९९५०५१
- 1 of 1098
- ››