महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया सक्रीय

महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया सक्रीय
महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया सक्रीय

जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि वाढत्या वाहतुकीची गरज म्हणून जळगाव शहराच्या बाहेरून राष्ट्रीय महामार्ग जात असून, भूसंपादित केलेल्या जागेवर मुरूम टाकून कच्चा रस्ता तयार झाला आहे. महामार्ग तयार होऊन दोन-तीन वर्षांनंतर जळगावकरांच्या उपयोगात येईल किंवा जळगाव शहरातील वाहतुकीवरील भार त्यानंतर कमी होण्यास मदत होईल. मात्र नव्या महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाळूमाफियांनी शेतातच डंपिंग ग्राऊंड करीत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूसाठे तयार केल्याचे आढळून येत आहे.

जळगाव शहराची वाढती लोकसंख्या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ऐशियन महामार्गात परिवर्तित होऊन महामार्गाचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे शहरातून जाणारा हा महामार्ग शहर वासीयांच्या जिवावर उठला आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे विस्तारीकरणासहीत शहराच्या बाहेरून पाळधी ते तरसोद असा नवा चौपदरी महामार्ग प्रस्तावित आहे.

महामार्गासाठी भूसंपादन झाले असून पाळधी कडून नदीपर्यंत सपाटीकरण करून मुरूम टाकून कच्चा रस्ताही तयार झाला आहे. जिल्ह्यातील राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय तोकडे प्रयत्न पाहता या महामार्गाला तयार होण्यास जवळपास दोन ते तीन वर्षे लागतीलच पण, तत्पूर्वीच हा कच्चा रस्ता वाळू माफियांच्या उपयोगाचा ठरला आहे. गिरणानदीतून रात्रंदिवस होणारे वाळूचे अवैध उत्खनन थांबवण्यास महसूल प्रशासन पुर्णत: अपयशी ठरले असून वाहतुकीवर कारवाई होऊ लागल्याने वाळूचोरट्यांनी नदीतून अवैधपणे काढलेल्या वाळूचे साठे या महामार्गाला लागून केले आहेत. महसूल पथक नदीत शोधत असताना या साठ्यांवरून वाळू उचल करून विक्री होते. पाळधीकडून आव्हाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाळू साठविण्यात आली असून, महसूल प्रशासनाला या वाळूवर कारवाई करण्यास अद्याप तरी उसंत मिळाली नाही. 

शेतकऱ्यांना धमक्‍या नव्या होत असलेल्या महामार्गाशेजारी शेतकऱ्यांच्या शेतात बळजबरीने वाळू साठविण्यात येत असून विरोध केल्यावर धमकावले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. बांभोरी, अव्हाणी, पाळधी, भोकणी आदी गावांतही मोठ्या प्रमाणावर वाळूसाठे तयार झाले आहेत. प्रशासनाला तक्रारी केल्यावर गप्प राहण्यास सांगण्यात येते. आतापर्यंत ही वाळू रस्त्याच्या कामासाठी टाकत असल्याचे सांगितले जात होते. मात्र साठवणुकीसोबतच वाहतूक सुरू असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com