कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा : केंद्रीय कृषिमुल्य आयोग

कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६० रुपये वाढीची शिफारस ‘सीएसीपी’ने केली आहे.
msp
msp

नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६० रुपये वाढीची शिफारस ‘सीएसीपी’ने केली आहे. सोयाबीनमध्ये १७० रुपये, तुरीमध्ये २०० रुपये, बाजरीमध्ये १५० रुपये, उडदाला ३०० रुपये आणि कारळाच्या हमीभावात सर्वाधीक ७५५ रुपये वाढ करण्याची शिफारस केंद्रीय कृषीमुल्य आयोगाने (सीएसीपी) केली आहे.  केंद्रीय कृषीमुल्य आयोगाने खरिपातील १७ पिकांसाठी हमीभावात वाढ करण्याची शिफारस केली आहे. ‘सीएसीपी’चा हमीभावा वाढीचा प्रस्ताव संबंधीत मंत्रालयकडे सादर झाला असून त्यावर चर्चा सुरु आहे. साधारणपणे केंद्र सरकार ‘सीएसीपी’चा प्रस्ताव कोणताही बदल न करता मंजुर करत असते.  खरीप भाताचा हमीभाव गेल्या वर्षीच्या तुलनेत २.९ टक्के म्हणजेच ५३ रुपयांनी वाढविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ‘ए’ग्रेडच्या भाताला यंदा १८८८ रुपये हमीभाव मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १८३५ रुपये दर होता. खरिपात भात हे महत्वाचे पीक असून एकूण खरिपाच्या ४० टक्के क्षेत्रावर भाताची लागवड होते. तर तेलबियांमध्ये महत्वाच्या असलेल्या कारळाच्या हमीभावात सर्वाधीक ७५५ रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.  २०२०-२१ च्या खरीपात पिकांच्या हमीभाव  वाढीची शिफारस पुढीलप्रमाणे (रुपये/प्रतिक्विंटल) 

पीक २०१९-२० २०२०-२१ 
भात (सामान्य) १८१५ १८६८ 
भात (ए ग्रेड) १८३५ १८८८ 
बाजरी २००० २१५० 
मका १७६० १८५० 
तूर ५८०० ६००० 
उडीद ५७०० ६०००
मूग ७०५० ७१९६ 
भुईमुग ५०९० ५२७५ 
सोयाबीन ३७१० ३८८० 
कापूस(मध्यम धागा) ५२५५ ५५१५ 
कापूस (लांब धागा) ५५५० ५८२५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com