तूर, उडदाच्या हमीभावात ३०० रुपये वाढ 

केंद्र सरकारने तूर आणि उडदाच्या हमीभावात ३०० रुपयांनी वाढ केली आहे. तर सोयाबीनमध्ये केवळ ७० रुपये, मक्यात २० रुपये आणि मुगाचा हमीभाव ७९ रुपयांनी वाढविला आहे.
tur moong urad
tur moong urad

नवी दिल्ली ःकेंद्र सरकारने तूर आणि उडदाच्या हमीभावात ३०० रुपयांनी वाढ केली आहे. तर सोयाबीनमध्ये केवळ ७० रुपये, मक्यात २० रुपये आणि मुगाचा हमीभाव ७९ रुपयांनी वाढविला आहे. कापसाला लांब धाग्यासाठी २०० आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपये हमीभावात वाढ करण्यात आली. 

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२१-२२ साठी पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. यंदा देशातील कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली महागाई, यामुळे सरकार या दोन्ही पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात मोठी वाढ करेल, अशी आशा होती. मात्र सरकारने यंदा कडधान्यामध्येच मोठी वाढ केली. तूर आणि उडदाच्या हमीभाव प्रत्येकी ३०० रुपयांनी वाढवत ६३०० रुपये केला आहे. तर मुगाला ७९ रुपये वाढ देत ७२७५ रुपये हमीभाव जाहीर केला. कापसाला लांब धाग्यासाठी २०० रुपये वाढ देत ५०५२ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपये वाढ देत ५७२६ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. 

धानाला दोन्ही ग्रेडसाठी ७२ रुपये वाढ देण्यात आली असून, अनुक्रमे १९४० आणि १९६० रुपये दर जाहीर केला आहे. बाजरीसाठी १०० रुपये वाढ देत २२५० रुपये, भुईमुगाला २७५ रुपये वाढ देत ५५५० रुपये, सूर्यफुलाला १३० रुपये वाढ देत ६०१५ रुपये, तिळासाठी सर्वाधिक ४५२ रुपये वाढ देत ७३०७ रुपये आणि कारळ्यासाठी २३५ रुपये वाढ देत ६९३० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. रागीसाठी ८२ रुपये वाढ देत ३३७७ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.  उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचा दावा  केंद्राने पुन्हा एकदा उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला आहे. सर्वंच पिकांना उत्पादन खर्चाच्या किमान ५० टक्के नफा होणार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना मालदांडी ज्वारीत ५१ टक्के बाजरीत तब्बल ८५ टक्के, तुरीत ६२ टक्के, उडदात ६५ टक्के आणि लांब धाग्यात कापसात ५८ टक्के फायदा होणार आहे, असे केंद्राने म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com