agriculture news in Marathi hiked in tur and urad msp by 300 rupees Maharashtra | Agrowon

तूर, उडदाच्या हमीभावात ३०० रुपये वाढ 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

केंद्र सरकारने तूर आणि उडदाच्या हमीभावात ३०० रुपयांनी वाढ केली आहे. तर सोयाबीनमध्ये केवळ ७० रुपये, मक्यात २० रुपये आणि मुगाचा हमीभाव ७९ रुपयांनी वाढविला आहे. 

नवी दिल्ली ःकेंद्र सरकारने तूर आणि उडदाच्या हमीभावात ३०० रुपयांनी वाढ केली आहे. तर सोयाबीनमध्ये केवळ ७० रुपये, मक्यात २० रुपये आणि मुगाचा हमीभाव ७९ रुपयांनी वाढविला आहे. कापसाला लांब धाग्यासाठी २०० आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपये हमीभावात वाढ करण्यात आली. 

केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२१-२२ साठी पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. यंदा देशातील कडधान्य आणि तेलबिया उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली महागाई, यामुळे सरकार या दोन्ही पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात मोठी वाढ करेल, अशी आशा होती. मात्र सरकारने यंदा कडधान्यामध्येच मोठी वाढ केली. तूर आणि उडदाच्या हमीभाव प्रत्येकी ३०० रुपयांनी वाढवत ६३०० रुपये केला आहे. तर मुगाला ७९ रुपये वाढ देत ७२७५ रुपये हमीभाव जाहीर केला. कापसाला लांब धाग्यासाठी २०० रुपये वाढ देत ५०५२ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपये वाढ देत ५७२६ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. 

धानाला दोन्ही ग्रेडसाठी ७२ रुपये वाढ देण्यात आली असून, अनुक्रमे १९४० आणि १९६० रुपये दर जाहीर केला आहे. बाजरीसाठी १०० रुपये वाढ देत २२५० रुपये, भुईमुगाला २७५ रुपये वाढ देत ५५५० रुपये, सूर्यफुलाला १३० रुपये वाढ देत ६०१५ रुपये, तिळासाठी सर्वाधिक ४५२ रुपये वाढ देत ७३०७ रुपये आणि कारळ्यासाठी २३५ रुपये वाढ देत ६९३० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. रागीसाठी ८२ रुपये वाढ देत ३३७७ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला. 

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचा दावा 
केंद्राने पुन्हा एकदा उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला आहे. सर्वंच पिकांना उत्पादन खर्चाच्या किमान ५० टक्के नफा होणार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना मालदांडी ज्वारीत ५१ टक्के बाजरीत तब्बल ८५ टक्के, तुरीत ६२ टक्के, उडदात ६५ टक्के आणि लांब धाग्यात कापसात ५८ टक्के फायदा होणार आहे, असे केंद्राने म्हटले आहे. 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...