हिंगोली जिल्ह्यात पिकांचे ३४० गावांतील पंचनामे पूर्ण

हिंगोली जिल्ह्यात पिकांचे ३४० गावांतील पंचनामे पूर्ण
हिंगोली जिल्ह्यात पिकांचे ३४० गावांतील पंचनामे पूर्ण

हिंगोली : ‘‘जिल्ह्यातील ७०७ गावांतील २ लाख ४५ हजार ९१० शेतकऱ्यांच्या २ लाख २५ हजार २७५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली असल्याचे नजर अंदाज सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. त्यापैकी ३४० गावांतील १ लाख १६ हजार ५९० शेतकऱ्यांच्या १ लाख १३ हजार १२६ हेक्टरवरील पीकहानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या चार दिवसांत पंचानाम्याचे काम पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात येईल’’, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

पाऊस आणि अतिवृष्टीमुळे काढलेले, कापलेले सोयाबीन, वेचणीस आलेला कापूस, काढणीस आलेली, काढलेली ज्वारी, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. नजर अंदाज सर्वेक्षणानुसार, हिंगोली तालुक्यातील १५२ गावांतील ५९ हजार १६० शेतकऱ्यांचे एकूण ३३ हजार ६१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी आतापर्यंत ५९ गावांतील १८ हजार ६६२ शेतकऱ्यांच्या एकूण १३ हजार ६३.४ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. 

कळमनुरी तालुक्यातील १४८ गावांतील ५८ हजार २९६ शेतकऱ्यांची एकूण ५३ हजार ९७ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. त्यापैकी ४८ गावांतील १४ हजार ५७४ शेतकऱ्यांच्या एकूण १३ हजार २७४.७५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचानामे पूर्ण झाले. वसमत तालुक्यातील १५२ गावांतील ४२ हजार ७६७ शेतकऱ्यांच्या एकूण ३१ हजार ५५३ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. त्यापैकी ८० गावांतील ३२ हजार ७५ शेतकऱ्यांच्या २३ हजार ६६४.७५ हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले आहेत. 

औंढा नागनाथ तालुक्यातील १२२ गावांतील ३७ हजार १०५ शेतकऱ्यांचे ४८ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. यापैकी ४९ गावांतील १४ हजार ८४२ शेतकऱ्यांचे १९ हजार ५८१.२ हेक्टर क्षेत्राचे पंचानामे पूर्ण झाले. सेनगाव तालुक्यातील १३३ गावांतील ४८ हजार ५८२ शेतकऱ्यांचे एकूण ५८ हजार ५७ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी आजवर १०४ गावांतील ३६ हजार ४३७ शेतकऱ्यांचे ४३ हजार ५४३ हेक्टरीवरील पंचानामे झाले.

पीकहानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येईल. शासन नियमानुसार देय अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे, असे जयवंशी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com