हिंगोली जिल्ह्यात भुईमुगाची १ हजार ८१६ हेक्टरवर पेरणी

In Hingoli district sowing 1 thousand 816 hectares of groundnut
In Hingoli district sowing 1 thousand 816 hectares of groundnut

हिंगोली : ‘‘यंदा सिंचन स्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २ हजार ९६२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे,’’ अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या मोठ्या धरणांसह लघू तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. विहिरी, कुपनलिका यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील इसापूर येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्पामध्ये पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. येलदरी धरणातील पाण्यावर सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकांची पेरणी केली. जिल्ह्यातील उन्हाळी पिकांचे सर्वाधिक क्षेत्र एकट्या सेनगाव तालुक्यात आहे. 

सिद्धेश्वर धरणातील कालव्याच्या लाभक्षेत्रातील औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यामध्ये, तर इसापूर कालव्याच्या लाभक्षेत्रातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये उन्हाळी पिकांचा पेरा वाढला आहे. उन्हाळ्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या भुईमुगाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ८१६ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली. चारा पीक म्हणून एकूण १ हजार ३० हेक्टरवर मक्याची पेरणी केली आहे, असेही कच्छवे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com