जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली वाळू
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा लागलेल्या अवस्थेतील शेतातील उभे तुरीचे पीक बुरशीजन्य मर रोगामुळे वाळून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा लागलेल्या अवस्थेतील शेतातील उभे तुरीचे पीक बुरशीजन्य मर रोगामुळे वाळून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
खरिपातील अन्य पिकांप्रमाणे तूर देखील हाती लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ४५ हजारांवर हेक्टरवर तुरीची लागवड झाले आहे. खरिपातील सोयाबीननंतर तुरीचे पीक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. सध्या तुरीचे पीक फुलोरा तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव, चिंचोली निळोबा, उखळी, जलापूर ,साळणा, पार्डी सावळी, रुपुर,धार, भगवा, चिमेगाव आदींसह जिल्ह्यातील अन्य भागात तूर पिकांवर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे तुरीचे पीक वाळून जात आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता तुरीचे पीक वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
चिंचोली येथील शेतकरी गुलाबराव मोरे यांचे दोन एकरावरील तुरीचे मर रोगामुळे नुकसान झाले. पार्डी येथील प्रकाश कुटे, येळी येथील निळकंठ नागरे आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या तूर पिकांचे नुकसान झाले.
‘‘जिराईतीबहुल जिल्ह्यात तूर हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. मर रोगासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे तुरीचे पीक वाळून जात आहे. तुरीच्या मर रोग प्रतिकारक्षम वाणांची लागवड हा रोगाला प्रतिबंध करण्यातील एक महत्वाचा पर्याय आहे’’, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी सांगितले.
- 1 of 1022
- ››