Agriculture news in marathi In Hingoli, farmers sell fruits and vegetables for 1.5 thousand quintals | Agrowon

हिंगोलीत शेतकऱ्यांची दीड हजार क्विंटलवर भाजीपाला, फळांची विक्री

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

हिंगोली :‘‘‘लॅाकडाउन’मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला-फळे विक्रीसाठी कृषी विभागातर्फे मदत केली जात आहे. शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्रीतंर्गंत गुरुवारी (ता.२७) ते मंगळवार (ता.१४) या कालावधीत एकूण १ हजार ६३८ क्विंटल भाजीपाला- फळांची विक्री झाली आहे’’, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी दिली. 

हिंगोली :‘‘‘लॅाकडाउन’मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला-फळे विक्रीसाठी कृषी विभागातर्फे मदत केली जात आहे. शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्रीतंर्गंत गुरुवारी (ता.२७) ते मंगळवार (ता.१४) या कालावधीत एकूण १ हजार ६३८ क्विंटल भाजीपाला- फळांची विक्री झाली आहे’’, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी दिली. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॅाकडाउन सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला फळे विक्रीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी कृषी विभाग ‘आत्मा’तंर्गंत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्फे ग्राहकांना थेट भाजीपाला विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळत आहे. शेतकऱ्यांचाही अधिक फायदा होत आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्हि. डी. लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी गटांना वाहन परवाने मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्रीतंर्गंत मंगळवार (ता.१४) पर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ६३८ क्विंटल भाजीपाल्याची विक्री झाली आहे. त्यात हिंगोली तालुक्यातील २९० क्विंटल, कळमनुरी तालुक्यातील २७५ क्विंटल, वसमत तालुक्यातील ३५२ क्विंटल, औंढानागनाथ तालुक्यातील ३२२ क्विंटल, सेनगाव तालुक्यातील ३५८ क्विंटल भाजीपाला फळांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...