हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये प्रतिक्विंटल

‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील भूसार मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.३) हरभऱ्याची ६२० क्विंटल आवक झाली होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला ४१०० ते ४३५८ रुपये दर मिळाले,’’ अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
in Hingoli gram rate 4100 to 4358 per quintal
in Hingoli gram rate 4100 to 4358 per quintal

हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील भूसार मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.३) हरभऱ्याची ६२० क्विंटल आवक झाली होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटलला ४१०० ते ४३५८ रुपये दर मिळाले,’’ अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गव्हाची २२ क्विंटल आवक होती. गव्हाला प्रतिक्विंटल १६०० ते २२४५ रुपये दर मिळाले. संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीची ४ हजार क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटलला ५२०० ते ५६०० रुपये दर मिळाले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२) हळदीची ३३५ क्विंटल आवक झाली होती. हळदीला प्रतिक्विंटल ५००० ते ६८०० रुपये दर मिळाले. तुरीची ३५ क्विंटल आवक होती. तिला प्रतिक्विंटलला ५००० ते ५१५० रुपये दर मिळाले.

हरभऱ्याची ४८ क्विंटल आवक होती. त्यास प्रतिक्विंटलला ४००० ते ४१५० रुपये दर मिळाले. गव्हाची ५ क्विंटल आवक होती. गव्हाला प्रतिक्विंटलला १ हजार १७१५ रुपये दर मिळाले. सोयाबीनची १०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३५०० ते ३६०० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची २ क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटलला ४६०० ते ५३५१ रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२) हरभऱ्याची ३५ क्विंटल आवक झाली होती. हरभऱ्याला प्रतिक्विटंलला ४०२५ ते ४१२० रुपये दर मिळाले. 

तुरीला ५२७० ते ५४०० रुपये दर

तूरी (लाल) ची २२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५२७० ते ५४०० रुपये दर मिळाले. तुरी (पांढरी) ची १८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५२७५ ते ५४०० रुपये दर मिळाले. सोयाबीनची ४५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३६२० ते ३६६० रुपये दर मिळाले. गव्हाची ११० क्विंटल आवक होती. गव्हाला प्रतिक्विंटलला १७७५ ते २१८० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com