हिंगोलीत व्यापारी, खासगी बॅंकांकडून १५ टक्केही कर्जवाटप नाही

हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता. ५) पर्यंत ३७ हजार ६६८ शेतकऱ्यांना १९७ कोटी ९७ लाख ९५ हजार रुपये (१६.९४ टक्के) एवढे पीककर्ज वाटप केले आहे.
In Hingoli, there is no 15 percent loan disbursement from traders and private banks
In Hingoli, there is no 15 percent loan disbursement from traders and private banks

हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता. ५) पर्यंत ३७ हजार ६६८ शेतकऱ्यांना १९७ कोटी ९७ लाख ९५ हजार रुपये (१६.९४ टक्के) एवढे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. तरीही ४० टक्केच्या आतच वाटप आहे. व्यापारी, खाजगी बॅंकांचा हात आखडताच आहे. १५ टक्के देखील त्यांचे कर्जवाटप नसल्याची स्थिती आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने नुकताच २५ टक्केचा टप्पा ओलांडला आहे. पीक कर्जवाटपाची गती संथ असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या खरिपात १ हजार १६८ कोटी ९५ लाख रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात व्यापारी बॅंकांना ८५९ कोटी १० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १६० कोटी ९६ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला १४८ कोटी ८९ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे.

जिल्हा बॅंकेने आजवर २१ हजार ३६७ शेतकऱ्यांना ५३ कोटी ३१ लाख ९५ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. व्यापारी बॅंकांना सर्वाधिक उद्दिष्ट आहे. या बॅंकानी आजवर ९ हजार ९२३ शेतकऱ्यांना १०० कोटी ७१ लाख ३५ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची कर्जवाटपाची गती वाढली आहे. या बॅंकेने आजवर ६ हजार ३७८  शेतकऱ्यांना ४३ कोटी ९४ लाख ६५ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले.

बॅंकनिहाय पीक कर्जवाटप (कोटी रुपये)

बॅंक  उद्दिष्ट कर्जवाटप टक्केवारी शेतकरी संख्या
जिल्हा बॅंक  १४८.८९ ५३.३१ ३५.८१  २१३६७
व्यापारी बॅंक ८५९.१० १००.७१ ११.७२  ९९२३
म.ग्रा.बॅंक  १६०.९६ ४३९४ २७.३० ६३७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com