हिरजच्या रेशीम पार्कसाठी साडेसहा कोटी

हिरजच्या रेशीम पार्कसाठी साडेसहा कोटी
हिरजच्या रेशीम पार्कसाठी साडेसहा कोटी

सोलापूर  : ‘‘उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हिरज येथे रेशीम पार्क उभारण्यात येत अाहे. यासाठीच्या इमारत व अन्य सुविधांसाठी ६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. रेशीम पार्कच्या उभारणीचे काम जलदगतीने सुरू आहे, हे काम वेळेत आणि दर्जेदार करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे,'' अशी माहिती वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

देशमुख यांनी बांधकाम सुरू असलेल्या पार्कची नुकतीच पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. रेशीम उद्योगासाठी सोलापूरसह मराठवाडा, सांगली, पुणे आणि कर्नाटकासाठी मध्यवर्ती बाजारपेठ सोलापुरात व्हावी, यासाठी देशमुख यांनी पुढाकार घेऊन या राष्ट्रीय दर्जाच्या रेशीम पार्क उभारणीसाठी प्रयत्न केले. सध्या त्याचे काम प्रगतिपथावर आहे. रेशीम हा कमी पाण्यावर अधिक उत्पन्न मिळवून देणारा उद्योग आहे. दुष्काळामुळे शेतकरी या पिकांकडे वळत आहेत, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

 हिरज येथे संशोधन, खरेदी केंद्र होणार आहे. रेशीम कोष उत्पादन यांसह उद्योगाची संपूर्ण माहिती व मार्गदर्शनही उत्पादकांना मिळणार आहे. लवकरच या रेशीम पार्कमध्ये विक्री व्यवस्था, संशोधन, प्रशिक्षण, प्रक्रिया आणि निर्यात सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळेल. तालुक्‍यातील रोजगार वाढीसदेखील चालना मिळणार असून, या निमित्ताने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी गटशेती करावी, असे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले. 

हिरज रेशीम पार्कमुळे रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची परराज्यांतील व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबणार आहे. वाहतूक खर्च वाचणार आहे. रेशीम पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भाव स्थिती कळणार आहे. त्यानुसार उत्पादनाचे नियोजन करता येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com