हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः पंतप्रधान मोदी
गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने पिकांना हमीभावात ऐतिहासिक वाढ दिली आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने पिकांना हमीभावात ऐतिहासिक वाढ दिली आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत शेतीतील बदलासाठी अनेक प्रयत्न केले. सिंचनापासून ते अधिक तंत्रज्ञानापर्यंत, अधिक पतपुरवठा व शेतीमाल बाजार व्यवस्था, ते योग्य पीकविम्यापर्यंत, मातीच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करण्यापासून मध्यस्थांना दूर करण्यापर्यंत केले. सर्व प्रयत्न सर्वसमावेशक आहेत.’’
या दिवशी, दोन वर्षांपूर्वी पीएम-किसान योजनेस आपले कष्टकरी शेतकरी दिवसरात्र काम करून देशाला अन्न पुरवतात, त्यांना सन्मान आणि समृद्धीचे जीवन मिळावे या उद्देशाने प्रारंभ केला. शेतकऱ्यांची तपश्चर्या आणि शेतीवरची निष्ठा ही प्रेरणा देते. आमच्या सरकारला किमान आधारभूत मूल्याची (हमीभाव) खात्री देताना आणि यात ऐतिहासिक वाढ करण्याचे बहुमान लाभला, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्व काही प्रयत्न करत आहोत,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
वर्षाला सहा हजार
दोन वर्षांपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६००० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला होता. तीन हप्त्यांमध्ये २००० रुपयांपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग केली जाते.
- 1 of 1099
- ››