Agriculture news in Marathi Hit 55,000 hectares in Akola | Agrowon

अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून यामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. त्यातही ७३१९ हेक्टर जमीन वाहून गेल्याचा अंदाज आहे.

अकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून यामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. त्यातही ७३१९ हेक्टर जमीन वाहून गेल्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.

मागील आठवड्यात २१ व २२ जुलैला जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. अकोट व तेल्हारा तालुका वगळता अकोला, बार्शीटाकळी, मूर्तीजापूर, पातूर, बाळापूर या तालुक्यातील ३३ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. प्रामुख्याने अकोला, बाळापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाले ओसंडून वाहिले. शेतांचे बांध फुटून पाणी जागा मिळेल तेथून वाहिले. मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेली. 

जिल्ह्यात यंदा सुरुवातीला पावसातील खंडामुळे पेरण्या रखडल्या होत्या. यंदा सरासरीच्या ९६ टक्के क्षेत्रावर म्हणजेच चार लाख ६४ हजार २२२ हेक्टरवर पेरणी होऊ शकलेली आहे. त्यातच आता ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने यापैकी अनेकांना नव्याने पेरणी करण्याचे संकट आहे. अद्याप सखल भागात शेतांमध्ये पाण्याचे तळे बनलेले आहेत. 

प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात हे तळे असल्याने ते पाणी निचरा होण्यास बराच वेळ लागू शकतो. उभी पिके त्यात कुजण्याची भीती वाढत आहे. खरीप लागवडीची वेळ निघून गेल्याने आता पर्यायी पीक घ्यावे लागेल किंवा रब्बीपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. जमीन खरडून गेलेल्या क्षेत्रात मोठमोठे खड्डे तयार झाले. दगडाचा खच 
तयार झालेला आहे.

एक लाख ९० हजार शेतकऱ्यांनी काढला विमा
या खरीप हंगामात एक लाख ९० हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. शासनाने २३ जुलैपर्यंत मुदत वाढवून दिल्याने ही संख्या वाढली आहे. १८ जुलैपर्यंत हा आकडा लाखाच्या घरात होता. विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांचे या पावसाने नुकसान केले आहे. आतापर्यंत सुमारे १९०० शेतकऱ्यांच्या विमा कंपनीकडे तक्रारी आलेल्या आहेत. यामध्ये हजारोंची भर पडण्याची शक्यता आहे. आलेल्या तक्रारींपैकी एकाही शेतकऱ्यांच्या शेताचा कंपनीकडून पंचनामा करण्यात आलेला नसल्याची बाब रविवारी कृषिमंत्र्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांनीच मान्य केली होती. अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी कृषी यंत्रणांवर आलेली आहे. अकोला दौऱ्यावर असताना कृषिमंत्री दादा भुसे यांनी बोलताना विमा काढलेल्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे वारंवार कृषीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
 


इतर बातम्या
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...
ग्रामबीजोत्पादनासाठी करा ‘महाडीबीटी'’वर...परभणी  ः ‘‘यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यास...