वीज मीटर रीडिंग घेणाऱ्या ६ एजन्सींना दणका

चुकीचे वीज मीटर रीडिंग घेऊन ग्राहकांना मनस्ताप देणाऱ्या सहा एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे.
Hit 6 agencies taking electricity meter readings
Hit 6 agencies taking electricity meter readings

मुंबई : चुकीचे वीज मीटर रीडिंग घेऊन ग्राहकांना मनस्ताप देणाऱ्या सहा एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २, औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सींविरुद्ध गेल्या चार दिवसांत कारवाई करण्यात आली. या एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. 

मागील आठवड्यात महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर महावितरणने अखेर कारवाईला प्रारंभ केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश दिले होते. 

१ फेब्रुवारी रोजी सिंघल यांनी मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला होता. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सी विरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करू, असा इशारा दिला होता. तसेच या एजन्सी व संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशाराही दिला होता.

या एजन्सींवर कारवाई  बारामती परिमंडलमधील परिमल एंटरप्रायजेस (पांडरे, ता. बारामती, सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायझेस (सादलगाव,  ता. शिरूर, केडगाव विभाग), कल्याण परिमंडलमधील सुप्रिम पॉवर सर्व्हिसेस, (अंधेरी, वसई विभाग), नांदेडमधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल (दहेली, ता. किनवट, भोकर विभाग), औरंगाबादमधील नंदिनी एंटरप्रायझेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोलामधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सीद्वारे मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले.

बडतर्फ करण्याची कारणे

  • वीज मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे 
  • वीज मीटरचा फोटो अस्पष्ट असणे
  • रीडिंग न घेता आल्याचा हेतुपूरस्सर शेरा देणे  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com