नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना तडाखा

तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकातून पाणी वाहिले. पीक खरडून गेले. गहू वाढीच्या अवस्थेतील पीक पाण्याखाली गेले. काढणीस आलेली तूर गारपिटीत झोडपल्याने शेंगा फुटल्या. तूर, हरभरा, गव्हाचे खूप नुकसान झाले. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. - गुणवंत सुकळकर, शेतकरी,रुई, ता. माहूर, जि. नांदेड. पावसामुळे हरभरा, तूर, गहू, ज्वारीचे नुकसान झाले. पाऊस सुरू राहिला तर तूर तसेच रब्बी पिके वाया जाण्याची भीती आहे. - नामदेव पावले, धनोडा, ता. महागाव, जि. यवतमाळ
hit due to untimely rains in Nanded, Parbhani, Hingoli districts
hit due to untimely rains in Nanded, Parbhani, Hingoli districts

नांदेड : जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये गुरुवारी (ता. २) सकाळी झालेला जोरदार पाऊस, गारपिटीमुळे तूर, हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. या जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस येत आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या तुरीसह हरभरा, गहू, ज्वारी आदी रब्बी पिकांना मोठा तडाखा बसला. नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी आठपर्यंत आणि त्यानंतर माहूर, मुदखेड, भोकर, लोहा, हदगाव तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. माहूर, वानोळा, वाई बाजार, सिंदखेड आदी मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार हजेरी लावली. रुई, धनोडा (जि. यवतमाळ) आदी गावांत गारा पडल्या. पावसाचे पाणी हरभरा, गहू आदीसह भाजीपाला पिकांमध्ये साचून राहिल्याने नुकसान झाले.

गारपिटीमुळे तुरीचे पीक झोडपून निघाले. परभणी जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी तालुक्यासह अन्य भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (मिमी)

नांदेड जिल्हा ः माहूर १८, वानोळा १०, वाई बाजार २१, सिंदखेड २४, दाभड ४, मुगट, १०, बारड ४, भोकर २, मातुल २,मनाठा १०, पिंपरखेड २, आष्टी २.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com