हिवरेबाजारने मांडला तब्बल पंचविसावा पाण्याचा ताळेबंद

आमच्या गाव शिवारात पडणाऱ्या पावसामुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केला जातो. उपलब्ध पाण्याबाबत माहिती व्हावी आणि नियोजन करावे, यासाठी पाण्याचा ताळेबंद सादर केला जातो. पावसामुळे गावात उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्यावर आधारित वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करून सर्वांनी पीकपद्धती ठरवावी. ग्रामस्थांनी एकत्रित विचाराने दर वर्षीप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास भविष्यातील संभाव्य टंचाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना प्रकल्प संकल्प समिती
हिवरेबाजारने मांडला तब्बल पंचविसावा पाण्याचा ताळेबंद
हिवरेबाजारने मांडला तब्बल पंचविसावा पाण्याचा ताळेबंद

नगर ः राज्यातच नव्हे तर देशात जलसंधारणाच्या कामातून आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) गावाने यंदाच्या उपलब्ध पाण्याचा यंदा २५ वा ताळेबंद मांडला आहे. या गावाच्या शिवारात झालेल्या पावसामुळे ३६१.४३ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले असून, त्याचा यंदाच्या वर्षासाठी कसा वापर करायचा याचे गणित पाण्याच्या ताळेबंदातून मांडले आहे. यंदा पाऊसही गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त झालेला असल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर टंचाईला सामोरे जावे लागणार नाही असे स्पष्ट केले.  ज्येष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि आदर्श गाव योजना प्रकल्प संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजारने जंलसंधारणाच्या कामातून देशात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. हिवरे बाजार गावच्या शिवारात दरवर्षीच जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीच्याही कमी पाऊस पडतो. मात्र येथे झालेल्या लोकसहभागातील जलसंधारणाच्या कामामुळे पाणी जिरवले जात असल्याने त्याचा गाव-शिवाराला मोठा फायदा होत आहे. पाणीपातळी खालावणाऱ्या विंधनविहिरीही येथे घेतल्या जात नाहीत. पावसाळा संपल्यानंतर साधारण सप्टेंबरअखेरीस दरवर्षी ग्रामसभा घेऊन सुमारे २५ वर्षांपासून उपलब्ध पाण्याचा ताळेबंद गावासमोर सादर केला जातो. यंदा निवडणूक असल्याने अचारसंहितेमुळे ग्रामसभा घेता आली नाही. त्यामुळे सोमवारी येथील मुंबादेवीच्या यात्रोत्सवात गावकऱ्यांना तयार केलेला पाण्याचा ताळेबंदाचे वाचन करून दाखवले.  आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, दिल्लीहून आलेले महालेखानियंत्रक हरेंद्र सिंह, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी सुरेंद्र कुमार, राजेश कुमार व ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १८३ मिलिमीटर पाऊस जास्त झाला आहे. त्यातून ३६१.४३ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. पिण्याच्या पाण्यासाठी ५.०६ कोटी लिटर, शेतीसाठी ७६.६९ कोटी लिटर अन्य वापरासाठी ८५.६६ कोटी, बिगर शेती वापरासाठी ३.९१ कोटी लिटर पाणी लागेल. काटकसरीने वापर केला तर सुमारे ११०.०८ कोटी लिटर पाणी शिल्लक राहू शकते, असे ताळबंदातून स्पष्ट झाले आहे, असे येथील दीपक पवार यांनी सांगितले. असा मांडला पाण्याचा ताळेबंद

  •  गाव-शिवारात झालेला पाऊस ः ३७० मिलिमीटर
  •  एकून उपलब्ध पाणी ः ३६१.४३ कोटी लिटर
  •  जमिनीवर शेवटपर्यंत साठून राहणारे पाणी ः १८.०७ कोटी लिटर
  •  जमिनीत मुरणारे पाणी ः ३६.१४ कोटी लिटर 
  •  जमिनीत ओलावा स्वरूपात राहणारे पाणी ः १०८.४३ कोटी लिटर
  •  गावच्या वापरासाठी प्रत्यक्ष उपलब्ध होणारे पाणी ः १९५.७४ कोटी लिटर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com