पीककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे खाते ‘होल्ड’

दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पीककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची बचत खाते राष्ट्रीयीकृत बँकेने ‘होल्ड’ केली आहेत.
'Hold' account of farmers who are in arrears of crop loan
'Hold' account of farmers who are in arrears of crop loan

यवतमाळ : दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पीककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची बचत खाते राष्ट्रीयीकृत बँकेने ‘होल्ड’ केली आहेत. हा प्रकार बोरी (अरब) येथील राष्ट्रीयीकृत बँकेत समोर आला आहे. खाते ‘होल्ड’ झाल्याने शेतकऱ्यांना व्यवहार करण्यात अडचण निर्माण झाली आहे.  गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. नापिकीमुळे शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलेले पीककर्जाची रक्कम परत करता आली नाही. शेतकऱ्यांची अडचण पाहता राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. एक वेळा नाही, तर दोन कर्जमाफी झाल्या. निकषामुळे अनेक शेतकरी त्यातून वगळले गेलेत. त्यांची कर्जमाफी झाली नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना थकीत रक्कम भरता आली नाही. परिणामी पीककर्ज थकीत राहिले आहे. सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांकडे पीककर्जाची रक्कम थकीत आहे. मार्चअखेर असल्याने बँकांनी वसुली सुरू केली आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज वसुलीत आघाडीवर आहेत. वसुलीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. पीक कर्जाची थकीत रक्कम वसुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेने शेतकऱ्यांचे खाते होल्ड केल्याचा प्रकार बोरी अरब येथे समोर आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पीककर्ज थकीत आहे. अशा दीड हजारावर शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्या शेतकऱ्यांना खात्यात रक्कम टाकता येते. मात्र, खात्यामधून रक्कम काढता येत नाही.  या प्रकारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. काही शेतकऱ्यांनी यासंदर्भात संबंधित बँकेशी संपर्क साधला असता, आधी पीक कर्जाची थकीत रक्कम भरा, त्यानंतरच व्यवहार सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. थकीत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत रक्कम आहे. मात्र, अशांना खात्यामधून रक्कम काढण्यात अडचणी येत आहेत. 

या प्रकाराबाबत माहिती नव्हती. त्याची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कर्जवसुली करणे ठीक आहे. परंतु, अशा पद्धतीने खाते ‘होल्ड’ करता येत नाही.  - अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ. 

गेल्या दोन वर्षांपासूनची रक्कम थकीत आहे. बँकेत व्यवहार करण्यासाठी गेलो असता, पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी थकीत पीककर्जाची रक्कम भरण्याच्या सूचना केल्या. त्यानंतरच खाते सुरू होईल, असे सांगितले.  - पीककर्ज थकीत शेतकरी, बोरी अरब. 

वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचना आम्ही पाळत आहोत.  - महेंद्र कुंभारे, शाखा व्यवस्थापक, राष्ट्रीयीकृत बँक, बोरी अरब.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com