Agriculture news in Marathi Hold the key to technology for crop management: Dr. Devasarkar | Agrowon

पीक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा ः डॉ. देवसरकर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

कापूस,  सोयाबीन, मका, तूर अन्य पिकांचे व्यवस्थापन हे कृषिशास्त्रज्ञ यांच्याच मार्गदर्शनानुसार करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनी केले.

औरंगाबाद ः यंदा मराठवाड्यात पाऊस नियमित आणि भरपूर असल्याने बऱ्याच भागात विविध फळझाडांची लागवड शेतकरी करीत आहे. परंतु लागवड करण्यापूर्वी कलमांची निवड हा महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच लागवड करावी. त्यासोबत कापूस,  सोयाबीन, मका, तूर अन्य पिकांचे व्यवस्थापन हे कृषिशास्त्रज्ञ यांच्याच मार्गदर्शनानुसार करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड औरंगाबाद यांच्या वतीने शनिवारी (ता. १) शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन वेबिनारद्वारे केले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक या नात्याने डॉ. देवसरकर बोलत होते.

डॉ. संजय पाटील म्हणाले, की मोसंबी या फळझाडांची लागवड करताना जातिवंत व निरोगी रोपांची निवड करणे. ज्या रोपवाटिकेतून रोपे खरेदी करत असू त्यांची प्रथम मातृवृक्षाची पाहणी करणे. वय किती आहे याची काळजी घेणे. जास्त वयाची रोपे असतील तर कार्यक्षम मुळाची संख्या कमी असते. परिणामी बागेत पुढे चालून तूट निर्माण होते. झाडे पुढे चालून अशा बागेची फळे खरेदीसाठी व्यापारी ही धजत नाही. त्याचप्रमाणे लागवडीसाठी अंतर, कलमांची उंची, लागवडीसाठी डोळा दिशा हा पश्चिमेला असावा. रोपवाटिकेतून रोप शेतात प्रत्यक्षात आणेपर्यंत प्रवासातील काळजी घेणे. वर्षातून तीन वेळेस म्हणजे जानेवारी, एप्रिल, सप्टेंबरमध्ये झाडाच्या वयानुसार खत मात्र योग्य ठिकाणी देणे. त्यानंतर व्यवस्थापन करीत असताना चांगला सांगडा तयार झाला पाहिजे. जेणेकरून सूर्यप्रकाश सर्व पानांवर येईल आणि त्यामुळे झाडास स्वतः अन्न स्वतः तयार करण्याचे बळ मिळेल पर्यायाने बाग सुदृढ होण्यास मदत होईल, असे सांगितले. मोसंबी फळगळ समस्येने फार उग्र रूप धारण केले आहे. या विषयी नेमकी कारणे आणि उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. सूर्यकांत पवार यांनी  सतत पडणाऱ्या पावसापासून आपल्या विविध खरीप पिकाचे कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे. ज्यामुळे निश्चितच चांगले परिणाम पिकावर दिसतील. सध्या कापूस पिकाची समस्या वाढत आहे. त्यासाठी वेळीच उपाय हाती घ्यावेत, असे मार्गदर्शन केले.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. बंटेवाड म्हणाले, की बीटी कापूस, सोयाबीन आणि मका या पिकावर या काळात दिसून येत असलेल्या किडी त्याची ओळख नुकसान करण्याची पद्धत आणि या सर्व किडीचे एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर सामूहिक पद्धतीने केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मराठवाडा विभागात कुठेही टोळधाड नाही ते नाकतोडे आहेत. कृपया शेतकरी बांधवांनी भीती बाळगू नये. या दोन्ही वक्त्यांनी शेतकरी बांधवांच्या विचारलेल्या प्रश्नांना यथोचित उत्तरे दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे सहभागी होते.

वेबिनारचे संचालन डॉ. किशोर झाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. बसवराज पिसुरे आणि श्री. अशोक निर्वाळ यांनी परिश्रम घेतले. विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी आभार मानले.


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...