Agriculture news in Marathi Hold for tired ‘FRP’ in Nanded | Agrowon

नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीच्या मागणीसाठी नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी धरणे आंदोलन केले.

नांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीच्या मागणीसाठी नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी धरणे आंदोलन केले. यावेळी अधिकारी उपस्थित असल्यामुळे खुर्चीला निवेदन देण्यात आले.

नांदेड सहसंचालक कार्यालय (साखर) अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना ऊस गाळप झालेल्या उसाची पूर्ण रक्कम मिळाली नाही. काही कारखान्यांनी अग्रिम देऊन शिल्लक रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यामुळे साखर सहसंचालकांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले, परंतु शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी मिळाली नाही. यामुळे शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १४) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयाला घेराव घातला. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी निवेदन खुर्चिला डकविले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये बालाजी करकुले, एकनाथ माचनवाड, माधव शाहिरे, सीताराम गव्हाणे, दिगंबर करकुले, तुकाराम माचनवाड, नागोराव घारके, विश्वंभर माचनवाड, दत्ता बुचडे, दत्ता गुंडे, संजय गव्हाणे, नवनाथ गायकवाड, अमृता जंगमवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

महाराष्ट्र शुगर या कारखान्याचे शेतकऱ्यांची देणी असलेले एक कोटी रुपये परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पडून आहेत. ती रक्कम तत्काळ मागून घ्यावी. तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाकी परभणी जिल्हाधिकारी देऊन सदरचे पैसे शेतकऱ्याला तत्काळ मिळून देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...