Agriculture news in marathi; Holding Demand for promotion of Agricultural Assistant in Akola | Agrowon

अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या मागणीसाठी धरणे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या पदोन्नती प्रश्नावर तोडगा काढला जात नसल्याने पाचही जिल्ह्यातील कृषी सहायकांनी गुरुवारी (ता.२२) कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास सोमवार (ता.२६) पासून साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या पदोन्नती प्रश्नावर तोडगा काढला जात नसल्याने पाचही जिल्ह्यातील कृषी सहायकांनी गुरुवारी (ता.२२) कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास सोमवार (ता.२६) पासून साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

अमरावती विभागातील कृषी सहायकांना कृषीपर्यवेक्षक पदी पदोन्नतीची प्रक्रीया गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प पडलेली आहे. अनेकजण पात्र असूनही त्यांना हक्काची पदोन्नती मिळालेली नसल्याने आहे त्याच पदावर काम करावे लागत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेचे अमरावती विभागीय सचिव उमेश वानखडे यांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले होते. त्याबाबत तोडगा न निघाल्यामुळे पूर्वनियोजित आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती संघटनेचे कोशाध्यक्ष अनंत देशमुख यांनी दिली.

गुरुवारी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत कार्यरत असलेले शेकडो कृषी सहायक धरणे देण्यासाठी एकवटले होते. याविभागात सन २०११ मध्ये कृषी सहायक ते कृषीपर्यवेक्षक पदोन्नत्या करण्यात आल्या. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत ही प्रक्रिया या विभागात राबविण्यात आलेली नाही. २०११ ची पदोन्नती प्रक्रिया अंतरीम ज्येष्ठता यादीच्या आधारे तदर्थ पदोन्नती देऊन करण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठता यादी २७ ऑक्टोबर २०१५ ला प्रमाणीत करून अंतिम करण्यात आली. ही सूची अंतिम मानल्यास २०११ मध्ये दिलेल्या तदर्थ स्वरुपाच्या पदोन्नत्या चुकीच्या पद्धतीने झाल्या हेही स्पष्ट होते. तदर्थ पदोन्नती मिळालेले काही जण न्यायालयात गेलेले असल्याने ही प्रक्रिया पुढे जाऊ शकलेली नाही. 

जोपर्यंत न्यायालयीन प्रकरणाचा निवाडा पूर्ण होत नाही, तोवर अडचणी आहेत. यामुळे प्रशासनाकडून वारंवार न्यायालयाचा संदर्भ दिला जात आहे. मात्र हे असे किती वर्षे सुरू राहील याचे उत्तर मिळत नसल्याने कृषी सहायक नाराज आहेत. अमरावती विभागात कृषीपर्यवेक्षकांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. या पदांचा प्रभार कृषी सहायक वर्षानुवर्षे सांभाळत आहेत. परंतु आता कृषी सहायकांनी हे अतिरीक्त पदभार सोडले आहेत.

मग किती वर्षे तसेच राहायचे?
काही कृषी सहायकांनी न्यायालयात धाव घेतल्याने २०११ पासून या विभागात पर्यवेक्षक पदी पदोन्नत्या झालेल्या नाहीत. आता प्रशासनाकडून वारंवार न्यायालयाचा संदर्भ देत पदोन्नती प्रक्रिया पूर्णत्वास नेली जात नाही. परंतु हे प्रकरण वर्षानुवर्षे असेच रेंगाळत राहले तर अनेकजण सेवानिवृत्त होतील, तरीही त्यांना हक्काची पर्यवेक्षक पदावरील पदोन्नती मिळू शकणार नाही, अशी खंत कृषी सहायक व्यक्त करीत आहेत. यावर न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेत पदोन्नतीचा मार्ग काढण्याची मागणीसुद्धा ते करीत आहेत.

मंत्री, सचिव विभागाचेच; आता तरी न्याय मिळेल
सध्या राज्याचे कृषिमंत्री, कृषी सचिव हे अमरावती विभागातीलच आहेत. असे असतानाही कृषी सहायकांचा प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रणास्तरावर हालचाली केल्या जात नसल्याने कृषी सहायक नाराज आहेत. सध्या महत्वाची व अधिकाराची पदे अमरावती विभागात असून आता कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रश्नाला सोडवावे, अशी मागणी कृषी सहायकांनी केली आहे.

इतर बातम्या
अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती,...मक्यावरील लष्करी अळी (शा. नाव - स्पोडोप्टेरा...
संजीवकांचा वापर संतुलितपणेच व्हावानाशिक : द्राक्षबागेत आवश्यकतेनुसार रासायनिक...
‘महावितरण’कडून शेतकऱ्यांना अंदाजपंचे...नाशिक : अंबड परिसरात महावितरणकडून कृषी पंपाचे...
खरीप पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील पीकविमा योजनेला चांगला...
खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प भरलेजळगाव ः खानदेशातील अवर्षणप्रवण भागातील काही...
मत्स्योत्पादनात ठाणे जिल्हा अव्वलरत्नागिरी ः सागरी मत्स्योत्पादनात महाराष्ट्र...
निष्पक्ष निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जअकोला ः विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा...
मेळघाटातील शेतकऱ्यांना जाणून घ्यायचेय...औरंगाबाद : मेळघाटातील शेतकरी मराठवाडा आणि...
निकृष्ट बंधाऱ्याप्रकरणी तिघांवर गुन्हे...गडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात...
अनुदानावरील पशुखाद्य पुरवठ्यासाठी उद्या...नागपूर ः पशुखाद्याच्या तुटवड्यामुळे अडचणीत...
पूर्वहंगामी कापूस पिकाला पावसाचा फटकाजळगाव ः खानदेशातील पूर्वहंगामी कापूस पिकाला सततचा...
रयतच्या योगदानातून इतिहास घडेल ः शरद...सातारा: त्यागाचा विचार तत्कालीन पिढीत घडविण्यात...
सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका...नगर  ः दोन वेळचा घास भरवणाऱ्या...
दिवाळीनंतरच गाळप हंगाम सुरू होण्याची...कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान...
निवडणुकीत प्रभावी प्रचाराला मिळणार दहाच...बारामती, जि. पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच...
मराठवाड्यातही कपाशीवर लष्करी अळीचा आढळपरभणी : जिल्ह्यात मका पिकापाठोपाठ कपाशीवर काही...
पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढलापुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे...
द्राक्षावर तंबाखूची पाने खाणारी अळीभवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही...
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो...लातूर :  उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी...
गव्हावरील किडीच्या नियंत्रणासाठी सहजीवी...मोंटाना राज्य विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील...