Agriculture news in marathi, Holding of polyhouse-shednet farmers | Agrowon

उस्मानाबादमध्ये पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांचे धरणे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेडनेट व पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. ९) स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. या वेळी प्लॅस्टिक फुलांची होळी करण्यात आली. 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेडनेट व पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. ९) स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. या वेळी प्लॅस्टिक फुलांची होळी करण्यात आली. 

कर्जमाफीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी गेली तीन वर्षे सुरू असलेल्या लढ्याची शासन पातळीवरून अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यभरातील पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांनी त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकरी समन्वय समितीतर्फे देण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जवळपास १७० शेडनेट व पॉलिहाउसधारक शेतकरी या धरणे आंदोलनात सहभागी झाले. 

दुष्काळ, नापिकी, तापमानातील चढउतार, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा अल्प भाव, यासारख्या कारणांमुळे गेल्या पाच-सहा वर्षात राज्यातील पॉलिहाउस-शेडनेटची शेती तोट्यात गेली. पॉलिहाउस-शेडनेट शेती योजनांच्या अंमलबजावणीतल्या चुकीच्या शासन धोरणांचा या शेतकऱ्यांना फटका बसत आहे. नोकरीच्या मागे न लागता आधुनिकतेची कास धरत अनेक उच्चशिक्षित तरुण पॉलिहाउस-शेडनेट शेतीकडे वळाले. मात्र वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या तोट्याच्या शेतीतून डोक्‍यावरील बॅंक कर्जाचा डोंगर वाढला. परिणामी त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आधुनिक शेती करून आपण मोठी चूक केली, अशी भावना समितीने व्यक्‍त केली.  

कर्जमाफीसह अन्य समस्या सोडवाव्यात, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी गेली तीन वर्षे हे शेतकरी शासनपातळीवरून लढा देत आहेत. राज्याचे कृषिमंत्री व राज्यमंत्र्यांनी अडचणीत सापडलेल्या पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांबद्दल वेळोवेळी सहानुभूती व्यक्त केली. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही.

प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांवरच बोळवण केल्याने मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये १४ मागण्यांचा समावेश असल्याची माहिती ॲड. अमोल रणदिवे यांनी दिली. 
 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी...अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा...
शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच...
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे...रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे...
कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी...कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने...
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः...नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर...
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा...रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात...
सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना...सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे...
गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा...गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या...
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी...जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या...
खानदेशात कांदा लागवडी वाढण्याचे संकेतजळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा...
पुणे बाजार समितीतील बेकायदा हमाली,...पुणे  ः पुणे बाजार समितीमधील डाळिंब...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात...
तीन जिल्ह्यांत दीड हजार क्विंटल मूग...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
किसान सभेच्या दणक्यानंतर; परळीतील...पुणे ः परळी (जि. बीड) तालुक्यातील खरीप २०१८ मध्ये...
परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम आणि...
परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील...
नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे...नगर ः आक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची...
कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटलीकोल्हापूर  : यंदाच्या हंगामात कोणत्याही...
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त ...मुंबई  ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...