Agriculture news in marathi Holi of Agriculture Bill in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

औरंगाबाद / परभणी /  नांदेड : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. सरकार हमीभाव देण्यापासून दूर पळत ''कंत्राटी शेती'' च्या नावाखाली शेती कॉर्पोरेट कंपन्याच्या घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ''स्वाभिमानी'' ने केला.

औरंगाबाद / परभणी /  नांदेड : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. सरकार हमीभाव देण्यापासून दूर पळत ''कंत्राटी शेती'' च्या नावाखाली शेती कॉर्पोरेट कंपन्याच्या घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ''स्वाभिमानी'' ने केला. त्याविरोधात औरंगाबाद, नांदेड, परभणीसह मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. विधेयकांची शुक्रवारी (ता. २५) होळी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ असे, आश्वासन देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र आता हमीभाव देण्याची वेळ आली असता त्यापासून दूर पळत कंत्राटी शेतीचा घाट घालत आहे. शेती कॉर्पोरेट कंपन्याच्या हातात देऊ पाहत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर माल देण्याचे अधिकार देऊन हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी झाल्यास त्याला कारवाई करण्याची कुठलीही तरतुद त्यात नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या व मोठे व्यापारी साठेबाजी करून शेतीमालाचे भाव पाडतील. नंतर कृत्रिम टंचाई निर्माण करून तोच माल जादा दराने विकतील. यावर कोणताच अंकुश शासनाचा असणार नाही. हे विधेयक शेतकरी विरोधी आहे, असा आरोप ‘स्वाभिमानी’ने केला. 

तहसिल कार्यालय सिल्लोड येथे विधेयकांची होळी करून निषेध व्यक्त केला. विधेयके मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती वराडे, तालुकाध्यक्ष सुनिल सनान्से, तालुकासंघटक युवराज वराडे, राज्यकार्यकारणी सदस्य मुक्तराम गव्हाणे, भगवान खंबाट, लक्ष्मण मुरकुटे, दिलीप सावळतकर, विष्णू नेमाने, गोविंदा मुरकुटे आदी उपस्थित होते.

परभणीत विविध शेतकरी संघटनांचे आंदोलन 

स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष्यातर्फे परभणी येथे, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सेलू येथे विधेयकांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

 ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोडे, शेख जाफर, डिंगाबर पवार आदिसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात आले. किसान सभेतर्फे निदर्शने करण्यात आली. उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांना निवेदन देण्यात आले. 

नांदेडमध्ये कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक 

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्त्वात मालेगाव येथील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, पोलिसांनी शेकाप कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वी अटक केली. या वेळी विद्याधर तारु, मनोज शेळके, श्रीकांत कांबळे आदींना अटक करण्यात आली.

नांदेडमध्ये ‘स्वाभिमानी’कडून होळी

नांदेडमध्ये शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकांना विरोध करत त्यांची होळी करण्यात आली. केंद्र सरकार आता इतर क्षेत्राबरोबर शेती क्षेत्रालाही अडाणी आणि अंबानी यांच्या दावणीला बांधायला निघायली आहे, असा आरोप यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी केला. यावेळी तालुकाध्यक्ष मारोती भांगे, ज्येष्ठ नेते किसनराव कदम, मधुकरराव राजेगोरे, नेमाजी पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...