Agriculture news in marathi Holi of Agriculture Bills from Farmers Associations in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी विधेयकांची होळी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी (ता.२५) येथे विविध शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी (ता.२५) येथे विविध शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी त्यांच्या घरासमोर कृषी विधेयकाची होळी केली. तसेच सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
शेतकरी संघटना समन्वय समिती, किसान सभेचे अध्यक्ष डॉ. उदय नारकर, कॉ. नामदेव गावडे, ऊसतोडणी संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, ‘शेकाप’चे बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, बाबुराव कदम, आम आदमीचे संदीप देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश भोजकर आदींच्या नेतृत्वाखाली शहरात शेती विधेयकांची होळी करण्यात आली.

स्वतः शेट्टी यांनी अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील आपल्या घरासमोर विधेयकाच्या प्रतीची होळी केली. ‘कृषी विधेयक मागे घ्या’, ‘केंद्र शासनाने केंद्र शासनाचा अधिकार असो’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. शेट्टी हे नुकतेच करोनामुक्त झाले असल्याने त्यांनी बाहेर जाण्याचे टाळून घरासमोरच होळी करत केंद्र शासनाच्या विरोधातील संताप व्यक्त केला.

मोदी सरकारच्या या विधेयकामुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. केंद्र शासनाला शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल, तर आधी कृषी उत्पादनांना हमीभावाची खात्री द्यावी. त्या संदर्भातील कायदा मंजूर करावा, असे विधेयक मी २००८ साली संसदेमध्ये मांडले होते. ते मंजूर केले, तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, अन्यथा शेतकरी हिताच्या नावावर कार्पोरेट कंपन्यांचे भले होणार आहे, या विधेयकाच्या विरोधात स्वाभिमानीचे आंदोलन सुरू राहील, असा इशारा दिला.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...