नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये सरकारच्या निर्णयाची होळी

Holi of the government's decision in Piliv over water sharing of Nira-Deoghar
Holi of the government's decision in Piliv over water sharing of Nira-Deoghar

सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील पाणीवाटपासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची पत्रके निषेध म्हणून माळशिरस तालुक्‍यातील पिलीव येथे जाळण्यात आली. येथील अहिल्याबाई होळकर चौकात शुक्रवारी (ता. २१) झालेल्या या आंदोलनात सरकारच्या निर्णयाविरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

फलटण, माळशिरस सांगोला व पंढरपूर या चार तालुक्‍यांचे आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच हे आंदोलन केल्याने सरकारला घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जाते.

युवा सेनेचे माळशिरस विधानसभा प्रमुख शिवराज पुकळे म्हणाले, ‘‘राज्य सरकारला हा घरचा आहेर आहे. या निर्णयामध्ये ५५ टक्के पाणी बारामतीकडील नीरा- डावा कालव्यास व ४५ टक्के पाणीपुरवठा नीरा- उजवा कालव्याला जो फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूरकडे येतो, आशा असमान व अन्यायकारक पाणीवाटपचा निर्णय झाला आहे.’’ 

‘‘मुळात नीरा-देवघर धरण खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्‍यांसाठी बांधलेले आहे, असे आसताना हे संपूर्ण पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यांना मिळाले पाहिजे. मात्र, केवळ सदरील धरणास कालवे काढलेले नाहीत. याचा गैरफायदा घेऊन व सत्तेच्या जोरावर दबाव तंत्राचा वापर करून आमच्या हक्काचे पाणी बारामतीकडे वळविले आहे. कायम दुष्काळी आसणाऱ्या या तालुक्‍यांवर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे,’’ असे पुकळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन

राजकारण बाजूला ठेवून केवळ जनहितार्थ व शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठविला आहे. निर्णय पत्राची होळी करीत आहे, हा अन्यायकारक निर्णय रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. लवकरच तीव्र आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, असेही पुकळे यांनी सांगितले. या वेळी अनेक युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. युवासेनेने केलेल्या या आंदोलनामुळे सरकारचीही आता गोची होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com