Agriculture news in Marathi Holi of increased electricity bills in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

कोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत, तहसील व महावितरण कार्यालयासमोर सोमवारी (ता. १३) वीज बिलांची होळी करण्यात आली.

कोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत, तहसील व महावितरण कार्यालयासमोर सोमवारी (ता. १३) वीज बिलांची होळी करण्यात आली.

राज्य इरिगेशन फेडरेशन व राज्य वीजग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. लॉकडाउन काळातील तीन महिन्यांची ३०० युनिटपर्यंतची घरगुती वीज बिले शासनाने भरावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, माजी खासदार राजू शेट्टी, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील किणीकर, आर. के. पवार, बाबा पार्टे, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, समीर पाटील व सचिव मारुती पाटील उपस्थित होते.

श्री. होगाडे म्हणाले, की कोरोनाच्या संचारबंदीत महावितरणला ग्राहकांचे मीटर रीडिंग घेता आलेले नाही. ही वस्तुस्थिती असली तरी जूनमध्ये संचारबंदीत सूट मिळताच महावितरणने मार्च ते मे असे एकत्रित मीटर रिडिंग घेऊन त्याप्रमाणे ग्राहकांना बिले दिली आहेत. एप्रिलपासून वीज दरामध्ये वाढ केली आहे. तीन महिन्यांच्या आलेल्या वाढीव वीज बिलामुळे ग्राहक त्रस्त आहेत. कोरोनाच्या महामार्गामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असल्याने वाढीव बिले डोकेदुखी ठरत आहेत. एप्रिलमध्ये झालेली दरवाढ आम्हाला मान्य नाही. त्यासंदर्भात शासन प्रतिनिधींशी चर्चा करून दरवाढ मागे घ्यावी, अशी भूमिका आम्ही घेणार आहोत. सध्या वाढीव बिलाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...