बारामतीत एका क्लिकवर घरपोच किराणा

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळावा यासाठी बारामती पॅटर्नअंतर्गत किराणा होम डिलिव्हरी नावाचे अॅप तयार करण्यात आले आहे. एका लिंकद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसाठी अप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे एका क्लिकवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळणार आहे.
Home delivery to groceries with one click in Baramati
Home delivery to groceries with one click in Baramati

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळावा यासाठी बारामती पॅटर्नअंतर्गत किराणा होम डिलिव्हरी नावाचे अॅप तयार करण्यात आले आहे. एका लिंकद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसाठी अप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे एका क्लिकवर बारामतीकरांना घरपोच किराणा मिळणार आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दल आणि कोविड १९ टीम बारामतीतर्फे बारामतीमध्ये ऑनलाइन किराणा माल खरेदीसाठी किराणा होम डिलीव्हरी अॅप तयार करण्यात आले आहे. लिंकच्या माध्यमातून चार ते पाच मिनिटांत अॅप इस्टॅाल होते. अॅपच्या माध्यमातून इंग्रजी तसेच मराठीमध्ये जवळच्या माॅल अथवा दुकानदारास आॅर्डर पाठवता येते. संबंधित दुकानदार आॅर्डर तयार करून बारामती पॅटर्नमधील स्वयंसेवक उपलब्ध असतील तर त्याच्यामार्फत किवा स्वतःचे कर्मचारी पाठवून माल घरपोच देत आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पॅटर्न अंतर्गत नागरिकांना किराणा माल पोहोचवण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि पोलिस जवान स्वप्नील अहिवळे, विशाल जावळे, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय आणि बारामती नगरपरिषद, आरोग्य विभाग यांच्या प्रयत्नाने हे अॅप विकसित केले आहे. यामध्ये सर्व मोठ्या माॅलसह बाकी दुकानदारांचा समावेश आहे. आपण निवड केलेल्या माॅलला, दुकानदारास त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. ते आॅर्डर तयार करून घरी पाठवतील. दरम्यान आवश्यक असल्यास त्या दुकानदारांचा मोबाईल नंबरवर अॅप असल्याने तुम्ही त्यांना संपर्क करू शकता.

  अडचणींबाबत येथे संपर्क करा याबाबत काही अडचण आल्यास स्वप्नील अहिवळे ८८०५०२९१३८, विशाल जावळे ८६०५८०२४२४ पोलिस उपनिरीक्षक श्री. यादव यांना या ९९२३६३०६५२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com