Agriculture news in marathi Home dilivery cereal in Sangli, Miraj, Kupwad | Agrowon

सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच अन्नधान्य

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात प्रत्येक प्रभागात भाजीपाला, धान्य, दूध आदी जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते जादा दराने विक्री करत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे आता प्रशासनच या वस्तूंचे दर निश्‍चित करणार आहे. त्याच दराने विक्री करावी लागणार आहे.

सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात प्रत्येक प्रभागात भाजीपाला, धान्य, दूध आदी जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते जादा दराने विक्री करत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे आता प्रशासनच या वस्तूंचे दर निश्‍चित करणार आहे. त्याच दराने विक्री करावी लागणार आहे.

‘कोरोना’ विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पोलिसही संचारबंदी कडक राबवत आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रातील किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक सोडले तर दुपारी बारा वाजल्यापासून कडकडीत बंद दिसून येत आहे. नागरिकांची जीवनावश्‍यक वस्तूंसाठी गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने नगरसेवकांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागात धान्य, भाजीपाला, फळे, दूध आणि औषधे विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या नावांच्या यादी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांना नागरिकांना घरपोच सेवा देण्यास
सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.

मागील दोन दिवस घरपोच सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. प्रभागात भाजीपाला विक्रीच्या गाड्या दिसू लागल्या आहेत. किराणा दुकानदारही सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवत आहेत. त्यामुळे नागरिकांना गर्दी करण्याची गरज भासत नाही. मात्र याचा गैरफायदा विक्रेते घेत असून घरपोच सेवेसाठी जादा दर लावत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.
यावर उपाय म्हणून लवकरच प्रशासनच घरपोच दिल्या जाणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंचे दर निश्‍चित करणार आहे. त्यामुळे याच दराने विक्री करावी लागणार आहे.

घरपोच केल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे दर वाढवल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनच या वस्तूंचे दर निश्‍चित करणार आहे. त्याच दरात या वस्तू नागरिकांना मिळतील. जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- नितीन कापडणीस, आयुक्त,
सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...