Agriculture News in Marathi For home grown vegetables ‘Jijai Nano Kitchen Garden’ | Agrowon

घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो किचन गार्डन’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 जानेवारी 2022

घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात ‘जिजाई नॅनो किचन गार्डन’ची संकल्पना सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने मांडली असून, सुमारे पावणेचार फूट बाय सव्वासहा फुटांच्या जागेत या गार्डनमधून ११ ते १३ प्रकारच्या भाज्या मिळू शकतात. 
 

सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी कमी खर्चात ‘जिजाई नॅनो किचन गार्डन’ची संकल्पना सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राने मांडली असून, सुमारे पावणेचार फूट बाय सव्वासहा फुटांच्या जागेत या गार्डनमधून ११ ते १३ प्रकारच्या भाज्या मिळू शकतात. 

कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी ही संकल्पना मांडली. त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या घरी मॉडेल विकसित केले. त्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात त्याची उभारणी केली. रासायनिक कीटकनाशक आणि तणनाशकांचा वापर भाजीपाल्यामध्ये वाढला आहे. पण आता त्यात बदल अपेक्षित आहे. किमान आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी काही प्रयत्न व्हावेत, यासाठी ही संकल्पना आहे. मुख्यतः उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय पद्धतीने स्वतःचा भाजीपाला स्वतःच घरच्या घरी पिकवणे, हाच केवळ उद्देश या संकल्पनेमागे असल्याचे डॉ. तांबडे म्हणाले.
एका कुटुंबासाठी पुरेसा

घराच्या पटांगणात, परसबागेत, टेरेसवर हे मॉडेल उभा करता येते. पावणेचार फूट बाय सव्वासहा फूट जागेत प्लॅस्टिक पाइपच्या साह्याने शेडनेटच्या मांडवाखाली ते झाकले जाते. चार माणसांच्या कुटुंबाला आठवड्याला एक ते दीड किलो भाजीपाला यातून मिळतो, असा दावाही डॉ. तांबडे यांनी केला. साधारण सात हजार ते नऊ हजार रुपयांचा खर्च त्यासाठी येतो. अधिक माहितीसाठी गणेश कांबळे (९८५०८४८३५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. तांबडे यांनी केले आहे.

अटारीकडून दखल
भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत पुण्यातील कृषी तंत्रज्ञान अवलंबन व संशोधन संस्थेच्या (अटारी) इनोव्हेटिव्ह अॅप्रोचेस अॅण्ड इन्टरव्हेशन या देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या अहवालातही डॉ. तांबडे यांचा या संबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
 


इतर महिला
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न...सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण...
सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक...ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडमोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ...
गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्गज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक...
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
दूषित अन्नापासून सावध राहा...म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...