Agriculture news in marathi Home Minister caught officials on the verge of buying paddy | Agrowon

धान खरेदीवरून गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

गोंदिया जिल्हात धान खरेदी करण्यासाठी होत असलेल्या उशिरामुळे पालकमंत्री अनिल देशमुख चांगलेच संतापले आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २५ नोव्हेबरपर्यत सर्व धान खरेदी केंद्र सुरू करा.  २८ नोव्हेंबरला मी स्वतः आढावा घेणार असल्याचे सांगितले.
 

नागपूर  : गोंदिया जिल्हात धान खरेदी करण्यासाठी होत असलेल्या उशिरामुळे पालकमंत्री अनिल देशमुख चांगलेच संतापले आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. २५ नोव्हेबरपर्यत सर्व धान खरेदी केंद्र सुरू करा. तसेच २८ नोव्हेंबरला मी स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत गोंदिया येथे येऊन किती खरेदी झाली याचा आढावा घेणार असल्याचे सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्ह्यातील धान खरेदीचा आढावा ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरटे, जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे, जिल्हा पणन अधिकारी भारत भूषण पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, अतुल नेरकर, राजू जैन यावेळी उपस्थित होते. 

२८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पणन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात ७० धान खरेदी केंद्रांना व आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रात ४४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. असे असताना २२ नोव्हेंबरपर्यंत पणन अधिकाऱ्यांनी ४१ केंद्रांवर २१ हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ३ केंद्रावर २ हजार क्विंटल धान खरेदी केले. यामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदीविना पडून असून त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

२५ नोव्हेंबरपर्यंत सर्व केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू करावी, असे निर्देश त्यांनी पणन अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे नवीन केंद्रांना मंजुरी द्यावयाची झाल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...