पंढरपुरात निराधार, श्रावण बाळ योजनेचे ५ हजार लाभार्थी ः वाघमारे

सोलापूर : ‘‘ पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार १४५, तर श्रावणबाळ योजनेचे १ हजार ९५३ असे एकूण ५ हजार ९८ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत,’’ अशी माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.
Homeless, Shravan bal scheme in Pandharpur 5000 beneficiaries : Waghmare
Homeless, Shravan bal scheme in Pandharpur 5000 beneficiaries : Waghmare

सोलापूर : ‘‘राज्य शासनातर्फे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेअंतंर्गत निराधार, वृद्धापकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना लाभ दिला जातो. पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार १४५, तर श्रावणबाळ योजनेचे १ हजार ९५३ असे एकूण ५ हजार ९८ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत,’’ अशी माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.

‘‘निराधारांना आधार मिळावा, यासाठी संजय गांधी व श्रावण योजना शासनाने सुरु केली आहे. संजय गांधी निराधार योजनेत ३ हजार १४५ लाभार्थी लाभ घेत आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण योजनेचे २ हजार ७२४ , अनुसूचित जाती  २२९ व  अनुसूचित जमातीचे  १९२ लाभार्थी लाभ घेत आहेत. श्रावणबाळ योजनेतील १ हजार ९५३  लाभार्थ्यांपैकी सर्वसाधारण योजनेचे १ हजार ५७४,  अनुसूचित जाती २६० व अनुसूचित जमातीचे ११९ लाभार्थी लाभ घेत आहेत. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती योजनेच्या लाभार्थ्यांचे माहे सप्टेंबर २०२० पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक  खात्यावर जमा करण्यात आले,’’ अशी माहिती वाघमारे यांनी दिली.

श्रावणबाळ योजनेच्या सर्वसाधारण योजनेमधील १ हजार ५७४ लाभार्थ्यांचे ऑगस्ट २०२० पर्यंतचे अनुदान जमा करण्यात आले आहे. तर, संजय गांधी  निराधार योजनेच्या सर्वसाधारण योजनेमधील २ हजार ७२४ लाभार्थ्यांचे जुलै २०२० पर्यंतचे अनुदान  लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com