Agriculture news in marathi Homeowners should not rent a month's | Agrowon

घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये : परभणी जिल्हाधिकारी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

परभणी ः जिल्ह्यामध्ये परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून मजुरी, व्यवसाय, शिक्षण, इतर कारणांमुळे परभणी जिल्ह्यात घर भाड्याने घेऊन वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी. म. मुगळीकर यांनी केले आहे.

परभणी ः जिल्ह्यामध्ये परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून मजुरी, व्यवसाय, शिक्षण, इतर कारणांमुळे परभणी जिल्ह्यात घर भाड्याने घेऊन वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी. म. मुगळीकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात परराज्यातून मजुरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर, व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग आदी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहत आहेत. ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राहणाऱ्या भाडेकरुंना सद्यस्थितीत घराबाहेर काढू नये तसेच ज्या नागरिकांची उपजीविका मजुरी किंवा व्यवसायावर अवलंबून आहे, अशा भाडेकरूंचे एक महिन्याचे भाडे संबंधित घरमालक यांनी घेऊ नये.

तसेच आपात्कालीन परिस्थितीत आपल्या भाडेकरुंना आवश्यकता असल्यास अन्नधान्य आणि इतर बाबतीत मदत करावी. त्यैामुळे १४ एप्रिल पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये अशा नागरिकांचे स्थलांतर होणार नाही आणि ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सहभागी होवून या आपत्तीचा सक्षमपणे सामना करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...