Agriculture news in Marathi The honesty of the onion grower | Page 3 ||| Agrowon

कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 जून 2021

जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची काही जण ओरड करीत असले, तरी दुसऱ्या बाजूला प्रामाणिक माणसेही आहेत. याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद (ता. सटाणा) येथील शेतकऱ्याने कांदा विक्रीपोटी व्यापाऱ्याकडून अधिकचे आलेले रोख २० हजार रुपये परत केल्याने आला.

नाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची काही जण ओरड करीत असले, तरी दुसऱ्या बाजूला प्रामाणिक माणसेही आहेत. याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद (ता. सटाणा) येथील शेतकऱ्याने कांदा विक्रीपोटी व्यापाऱ्याकडून अधिकचे आलेले रोख २० हजार रुपये परत केल्याने आला. याबद्दल बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकऱ्याच्या या व्यवहाराचा सन्मान केला आहे. 

सविस्तर माहिती अशी, की ताहाराबाद येथील कांदा उत्पादक पांडुरंग बाबाजी साळवे यांचा २८ क्विंटल कांदा त्यांचा मुलगा नितीन याने ३१ मे रोजी उमराणे (ता. देवळा) येथील श्री रामेश्‍वर कृषी मार्केट या खासगी बाजार समितीत विक्रीसाठी आणला. या कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल १,४३५ रुपयेप्रमाणे बोली लागली. हिशेबपट्टी होऊन त्यापोटी ३६ हजार ३७७ रुपये रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र येथील रेणुका अडत दुकानाच्या रोखपालाकडून ५६ हजार ३७७ रुपये इतकी रक्कम नजरचुकीने दिली गेली. ही रोख रक्कम घेऊन नितीन घरी आले. त्या वेळी रक्कम मोजली असता २० हजार रुपये जास्त आल्याचे लक्षात आले. त्यांच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी अधिकचे पैसे परत करा, अशी सूचना केली. 

यावर नितीन व त्यांचे भाऊ गजानन यांनी  बाजार समितीला हा प्रकार कळविला. व्यापाऱ्याकडे पुन्हा ही रक्कम परत करत प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. पांडुरंग साळवे हे सटाणा न्यायालयाचे सेवानिवृत्त सहायक अधीक्षक आहेत. शिस्त, प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे. त्यामुळेच लोभ न ठेवता त्यांनी पैसे बाजार समितीमार्फत परत केले. व्यवस्थापनाकडून त्यांचा मुलगा नितीन यांचा मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी कांदा व्यापारी, शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

फुकटचा पैसा नको, कष्टाचा पैसा हवा. आपण कष्टाने केलेले दोन पैसे जीवनात , समाधान देणारे असतात. त्यामुळे या भावनेतून पैसे परत केले. 
- पांडुरंग साळवे, कांदा उत्पादक शेतकरी

आमच्याकडून पैसे जास्त देण्यात आले. कुणाला जास्त पैसे गेले हे माहीत पण नव्हते. मात्र, या शेतकऱ्याने स्वतः संपर्क करून पैसे परत दिले. त्यामुळे असे शेतकरी आदर्शवत आहेत. 
- संतोष पांडे, रेणुका आडत दुकान, उमराणे.


इतर बातम्या
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...