नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
अॅग्रो विशेष
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘हनी देगा मनी' !
मधमाशीपालनासह मध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑनलाइन विक्रीमुळे मोठे जाळे निर्माण होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे.
- सुधाकर रामटेके, मधुमक्षिकापालक
नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या कुरबुरी आणि जाणीव जागृतीमुळे मधापासून बनविलेल्या ‘हनी क्युब’(मधाचे लहान तुकडे)च्या माध्यमातून युवक, मधुमक्षिकापालक आणि शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळविता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे डिजिटल युगात ‘हनी क्युब’ची ई-कॉमर्सद्वारे विक्री करता येणार असून, ‘हनी देगा मनी'' प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगानेही मधाचे क्युब्स बनविण्याचे काम सुरू केले आहे. २०२० मध्ये हनी क्युब्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यासाठी ''भारत क्राफ्ट'' नावाचे नवीन ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले जाणार असून त्याद्वारे विविध उत्पादनांची खरेदी विक्री केली जाणार असल्याचे संकेत आहेत.
‘भारत क्राफ्ट’ ई कॉमर्स पोर्टल
केंद्रीय सूक्ष्म, लघू और मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे लवकरच ‘भारत क्राफ्ट’ नावाने ई कॉमर्स पोर्टल सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात एसबीआयसोबतही चर्चा सुरू आहे. या पोर्टलद्वारे उत्पादित वस्तूंची विक्री केली जाणार आहे. मधाचे सेवन हानिकारक नाही. अँटीऑक्सिडंट्स, ‘क'' जीवनसत्त्व, खनिजे, अमीनो ॲसिडस् आणि काही एंझाइमनेदेखील मध परिणपूर्ण आहे. मधात असलेले स्टार्की फायबर डेक्सट्रिनचे मिश्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. मधामुळे मानवाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. साखरेच्या तुलनेत मध पचायला हलका असून शरीरातील रोगजंतूही मरतात.
आरोग्यदायी पर्याय
- साखरेच्या तुकड्यांऐवजी चहामध्ये मधू क्युब्स
- मधाचे उत्पादन वाढेल, उत्पन्नातही वाढ
- आदिवासींसह मधुमक्षिकापालकांना लाभदायक
- शेतकरी, युवक व बेरोजगारांसाठी फायद्याचे
दुधात खडीसाखर
साखरेऐवजी हमी क्युब्जचा वापर हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राहील याबाबत शंका नाही. मधुमेह असणाऱ्यांसाठी हनी क्युब्ज म्हणजे दुधात खडीसाखर आहे. कृषी क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. कारण मधमाशांमुळे परागीकरणाची प्रक्रिया होत असते. शेतकरी आणि युवकांनीही या व्यवसायातील भविष्यातील संधी ओळखून त्यादृष्टीने नियोजन करावे, असे डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर म्हणाले.