'युवामित्र'कडून उत्कृष्ट पशुपालक महिलांचा सन्मान

'युवामित्र'कडून उत्कृष्ट पशुपालक महिलांचा सन्मान
'युवामित्र'कडून उत्कृष्ट पशुपालक महिलांचा सन्मान

नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून युवामित्र संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या शाश्वत विकासाचे काम करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण महिला उपजीविका कार्यक्रमात शेळीपालन व्यवसायात सहभागी असलेल्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला पशुपालकांचा सन्मान रविवारी (ता. ८) करण्यात आला. युवामित्र सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले शेळीपालक उत्पादक कंपनी, एच. टी. पारेख फउंडेशन व बजाज अलायन्स इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक बी. एम. टाव्हरे, सिन्नर नगरपालिकेचे गटनेते हेमंत वाजे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अतुल वेदपाठक, नगरसेवक विजय जाधव, सिन्नर पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, डॉ. विजय कवडे, सौ. शेळके, राहुरी कृषी विद्यापीठाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिन्नर, संगमनेर व राहता तालुक्यातील ८० गावांमधील ४ हजार महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी ‘युवामित्र’च्या संचालिका मनीषा पोटे, सावित्रीबाई फुले शेलीपालक उत्पादक कंपनीच्या सुनंदा भाबड, किसनाबाई भले, मीराबाई आव्हाड, प्रमिला वेलजाळी, वैशाली ढमाले, मनीषा वेलजाळी, राणी पाचोरे आदी उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवामित्रचे संस्थापक व कार्यकारी संचालक सुनील पोटे यांनी केले. सूत्रसंचालन विलास पाटील केले. युवामित्रच्या सहायक संचालिका शीतल डांगे यांनी आभार मानले. उत्कृष्ट पशुपालकांचा सन्मानार्थी   उत्कृष्ट सखी : मीना आव्हाड, सुमन पठारे, वैशाली कडभाने, सईदा शेख, ललिता गडाख, अनसूया उघडे, चांगुणा खेताडे, कावेरी दिवेकर  उत्कृष्ट शेळी : सुमन मेंगाळ, सुरेखा कुटे, ज्योती हगवणे  उत्कृष्ट करडे : मंदा थोरात, सुजाता सहाणे, सुगंधाबाई दिघे  उत्कृष्ट गोठा : गीता रहाणे, बिजलाबाई पवार, गीता उघडे उत्कृष्ट पैदासीचा बोकड : जयश्री आंबडकर, सुमन कालेकर, लक्ष्मी आव्हाड  उत्कृष्ट गोठा, शेळी आणि करडे : जयश्री पांगारकर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com