कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची आगळी वेगळी वरात
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील कृषी पदवीधर असलेले नवरदेव पवन आहेर यांनी नवरदेवाच्या गाडीवर ‘शेतकरी’ असे नाव लावत वाहनाची सुंदर सजावट केली होती.
नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील कृषी पदवीधर असलेले नवरदेव पवन आहेर यांनी नवरदेवाच्या गाडीवर ‘शेतकरी’ असे नाव लावत वाहनाची सुंदर सजावट केली होती. शेतकरी नवरदेवाच्या सन्मानासाठी अशा प्रकारे गाडी सजविल्याचे पवन यांनी सांगितले.
विवाह सोहळा म्हटला म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही वेगळे पाहण्यास मिळते. कधी वरांची मिरवणूक, तर कधी स्टेजचे डेकोरेशन पाहण्यासारखे असते. पण या वराने गाडीवर स्वाभिमानाने शेतकरी, असे लिहिल्याचे त्यांची गाडी चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रगतशील शेतकरी समाधान कडू-आहेर यांचे पुतणे व अरुण आहेर यांचे चिरंजीव कृषी पदवीधर पवन याचे वनोली (ता. सटाणा) येथील पल्लवी यांच्या सोबत रविवारी (ता.२१) रोजी विवाह संपन्न झाला. हा विवाह मुलीकडे असल्याने नवरदेव ज्या वाहनावर जाणार होता, त्या वाहनाची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली. गाडीवर केलेली ही सजावट आगळीवेगळी आणि लक्षवेधक ठरली.
बाशिंग बांधून सजलेला नवरदेवाचा रुबाब आपण सर्वत्र बघतो. लग्नपत्रिकेत नवरदेवाचे शिक्षण आवर्जून टाकले जाते. शेतकरी वर किंवा नवरदेवाचा फारसा रुबाब दिसत नाही. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अशा अनेक उच्चशिक्षित नवरदेवाची वाहवाह केली जाते. पण शेतकरी मुलाचे किंवा शेतकरी नवरदेवाला कोणीही विचारत नाही. मुलीही देत नाहीत. पण लग्नासाठी निघालेल्या या नवरदेवाने चक्क आपल्या गाडीवर शेतकरी, असे नाव लावून शेतकऱ्यांचा मान वाढवला आहे.
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी
समाधान आहेर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी असून, उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन काढत असतात. आपल्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यास मुलांच्या आग्रहाखातर त्यांनी वरासाठी सजावट केलेल्या गाडीवर शेतकरी व वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा पुतळा ठेवत अफलातून सजावट केली होती. सजवलेल्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सर्वत्र कौतुक केले जात आहे.
- 1 of 1065
- ››