महापुराच्या बचावकार्यात मदत करणाऱ्या तरुणांचा सन्मान

महापुराच्या बचावकार्यात मदत करणाऱ्या तरुणांचा सन्मान
महापुराच्या बचावकार्यात मदत करणाऱ्या तरुणांचा सन्मान

नाशिक  : ऑगस्ट २०१९ मध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीच्याकाठी वसलेल्या चांदोरी, सायखेडा या गावांना महापुराने वेढा दिला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन अनेकजण पुरात अडकले होते. यासाठी येथील तीस युवकांनी पुढाकार घेऊन शोध व बचाव पथकाची स्थापना केली. त्यांनी महापुरात ६५ लोकांचे प्राण वाचवले; तर ९०० हून अधिकांना सुरक्षितस्थळी हलविले. याच कामाची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी त्यांचा सन्मान करत आवश्यक साहित्याचे वाटप केले.  महापुराच्यावेळी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी ५ लाइफ जॅकेट व बोट उपलब्ध करून दिली. त्याआधारे तरुणांनी अनेकांचे प्राण वाचवत त्यांना सुरक्षितस्थळी हलविले; तसेच कोणतीही अपेक्षा न करता जीवनावश्यक वस्तू व औषधांचा पुरवठाही केला. त्यांच्या कामाची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्या ३० युवकांना लाइफ जॅकेट, गणवेश, बुटांचे वाटप प्रजासत्ताक दिनानिमित्त सायखेडा येथे झालेल्या एका कार्यक्रमात केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, उपसरपंच शिरीष गडाख, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

प्रशासनाकडून दिले प्रशस्तिपत्र युवकांनी महापुरात केलेली मदत, प्रशासनास केलेले सहकार्य यामुळे प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, महसूल प्रशासनाच्या वतीने प्रशस्तिपत्रांचे वाटप करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com