Agriculture news in Marathi Honoring experimental farmers directly on the dam | Agrowon

प्रयोगशील शेतकऱ्यांचा थेट बांधावर सन्मान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

अमरावती ः आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते राजीव गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांचा थेट बांधावर जात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ही पालन या कार्यक्रमात करण्यात आले.

अमरावती ः आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते राजीव गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांचा थेट बांधावर जात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ही पालन या कार्यक्रमात करण्यात आले.

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विदर्भातील प्रयोगशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्‍तींना गौरविले जाते. यावर्षी मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्याने हा सोहळा होणार किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्‍त होत होती. मात्र, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कॉंग्रेस नेते प्रकाश साबळे यांनी मात्र दरवेळीप्रमाणे सभागृहात हा सोहळा न घेता थेट बांधावरच जात शेतकऱ्यांना गौरविण्याचा निर्णय घेतला.

ज्ञानेश्‍वर नांदणे (देवरा), डॉ. दीपक पाळेकर (शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती), प्रकाश मोहोड (धामोरी), योगिनी अर्डक (कृषी पत्रकार), रामभाऊ खडके (कुलांगणा खुर्द), दीपिका मानेकर (सायत), ऋषिकेश सोनटक्‍के (टाकरखेडा मोरे), अनुप गांजरे (सुरळी), मंजूताई पिल्हारे (अंजनवती), अनिल आडे (फुलआमला), नरेंद्र नाल्हे (आमला विश्‍वेश्‍वर), नरेंद्र उभाड (भिलोणा), सुनील बनसोड (शिवणी रसुलपूर), प्रफुल्ल हेलोडे (मोर्शी) यांचा थेट बांधावर जात सत्कार करण्यात आला.


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...