तुरीच्या पिकाकडून तूट भरून निघण्याची आशा

या वर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले असल्याने त्याची तूट तुरीच्या पिकातून भरून निघण्याची शक्यता दिसत आहे
Hope to fill the deficit from the trumpet crop
Hope to fill the deficit from the trumpet crop

साखरखेर्डा, जि. बुलडाणा ः यंदा या परिसरात तुरीचे पीक बहरलेले असून, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा उंचावली आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले असल्याने त्याची तूट तुरीच्या पिकातून भरून निघण्याची शक्यता दिसत आहे. 

सिंदखेडराजा तालुक्यात ४६०० हेक्टरवर या वर्षी तुरीचा पेरा झाला आहे. काही शेतकरी तूर अधिक सोयाबीन, तर काही शेतकरी कपाशीमध्ये तुरीचे आंतरपीक घेतात. या वर्षी तालुक्यातील जवळपास ३० ते ४० टक्के क्षेत्रावर तुरीचा पेरा झालेला आहे. पावसाळा लांबल्याने हा पाऊस तुरीला मानवला. 

सध्या जिकडे तिकडे शेतशिवारे पिवळीधमक दिसत आहेत. काही ठिकाणी तूर फूल धारणेच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी शेंगा धरल्या. बीडीएन-२, बीडीएन-७११ या तुरीच्या जाती लवकर येणाऱ्या असून, त्यांनी शेंगा धरलेल्या दिसून येत आहेत. तर इतर जातींच्या तुरी फुलोऱ्यात आहेत. सध्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर बुरशीजन्य रोग व शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी तुरीचे संरक्षण करण्यासाठी त्यावर बुरशीनाशक व औषधी फवारणी करण्यात गुंतले आहेत.

तुरीचे पेरणी क्षेत्र सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) तालुक्यात ४६०० हेक्टर आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोग तथा शेंगा पोखरणारी अळी वाढू शकते. तुरीच्या संरक्षणासाठी कृषी विभागाचे शिफारशी केल्यानुसार बुरशीनाशकांची व औषधांची फवारणी करावी व होणारे नुकसान टाळावे. - वसंत  राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com