मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीने १ लाख १४ हजार १८५ हेक्‍टरला दणका बसला आहे. ही माहिती प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात समोर आली आहे.
Hope for help in Marathwada now
Hope for help in Marathwada now

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत अतिवृष्टीने १ लाख १४ हजार १८५ हेक्‍टरला दणका बसला आहे. ही माहिती प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात समोर आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. त्यापाठोपाठ परभणी, जालना जिल्ह्याचा क्रमांक आहे. खरडलेल्या जमिनी अन हातची गेलेली पिके पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पानावलेल्या डोळ्यांना आता पंचनामे व मदतीची आस आहे.

मराठवाड्यात काही वेळा जूनमध्ये अतिवृष्टी झाली. पुन्हा जुलैच्या मध्यात पावसाने कहर केला. नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, बीड, लातूर हे जिल्हे कमी अधिक प्रमाणात पावसाच्या रडारवर होते. जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या सहा जिल्ह्यातील ९२३ गावांतील १ लाख ७८६७ शेतकऱ्यांच्या १ लाख १२ हजार ७४० हेक्टरवरील जिराईत, १३५५ हेक्‍टरवरील बागायत, तर ९० हेक्‍टरवरील फळपिकांचे दोन महिन्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान केले. 

नांदेडमधील सर्वाधिक तब्बल ५६३ गावांतील ९२३५३ शेतकऱ्यांच्या ७० हजार ८०६ हेक्‍टर ७० गुंठे क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा दणका बसला. सर्व जिराईत क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यातील २४२ गावांतील ३३९२७ हेक्‍टरवरील शेतीपिकांचे पावसाने नुकसान केले. यामध्ये ३३२३७ हेक्‍टरवर जिराईत, तर ६०० हेक्‍टरवरील बागायत व ९० हेक्‍टरवरील फळपिकांचा समावेश आहे. 

जालना जिल्ह्यातील ७९ गावशिवारांतील १४८१० शेतकऱ्यांच्या ६८४६ हेक्‍टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यामध्ये ६०९१ हेक्‍टर ५० गुंठ्यावरील जिराईत, तर ७५५ हेक्‍टरवरील बागायत क्षेत्राचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील १३ गावातील १२४४ हेक्‍टरवरील जिराईत पिकांचे अतिवृष्टीने नुकसान केले. लातूर जिल्ह्यातील १४ गावशिवारांतील ७०४ शेतकऱ्यांच्या ४६१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ गावशिवारातील ९०० हेक्‍टरवरील शेतीपिकांना दणका बसल्याची माहिती प्राथमिक अहवालात पुढे आली. 

दुबार पेरणी करून चांगली उगवण झालेल्या कापूस, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, बाजरी आशा खरीप हंगामातील पिकांची १३ जुलै,२१ जुलै या दिवशी झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसाने मोठी हानी केली. नदीकाठची पिके खरडून गेली.  गावशिवारातील इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले. शासनाने मदत द्यावी.

- सचिन भुतेकर, शेतकरी, अंतरवाली दाई, ता. घनसावनगी, जि. जालना.

पिकांचे भरपूर नुकसान झाले. खते, औषधे, बियाणे, मजुरी इत्यादी इत्यादी खर्च झाला. पिके हाती येईल का, हे सांगता येत नाही. आता पाणी कमी झाले. पण पिके करपली. त्यामुळे लवकर भरपाई मिळावी.  - संदीप लोंढे, शेवगळ, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com