Agriculture news in marathi Hopeful picture for planting mulberry this year in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी आशादायी चित्र

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा फटका बसला. यंदाचे तुलनात्मक उत्पादन पाहता जवळपास निम्मे कोष उत्पादन घटले. परंतु, यंदा महारेशीम अभियानात मराठवाड्याला २ हजार एकरवर तुती लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला. त्या तुलनेत ८ हजार ३९३.५ एकरवर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यासाठी ८३५९ शेतकऱ्यांनी तयारी दाखविली आहे. ही संख्या पाहता पुढचे वर्ष रेशीम उद्योगासाठी आशा वाढविणारे असेल, अशी स्थिती आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा फटका बसला. यंदाचे तुलनात्मक उत्पादन पाहता जवळपास निम्मे कोष उत्पादन घटले. परंतु, यंदा महारेशीम अभियानात मराठवाड्याला २ हजार एकरवर तुती लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला. त्या तुलनेत ८ हजार ३९३.५ एकरवर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यासाठी ८३५९ शेतकऱ्यांनी तयारी दाखविली आहे. ही संख्या पाहता पुढचे वर्ष रेशीम उद्योगासाठी आशा वाढविणारे असेल, अशी स्थिती आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये मराठवाड्यातील तुती लागवडीचे क्षेत्र ११ हजार ३७३ एकर होते. त्या वेळी राज्यातील एकूण तुती लागवडीचे क्षेत्र १९७८३ एकर होते. त्या तुलनेत ५८ टक्‍के क्षेत्रावर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना ३० लाख ९० हजार ३५३ अंडीपुंजचा पुरवठा करण्यात आला. त्याद्वारे कोष उत्पादकांनी १८०२.३६० टन कोषाचे उत्पादन केले. २०१९-२० मध्ये मराठवाड्यातील तुती लागवडीचे क्षेत्र जवळपास एक हजार एकरने घटून १० हजार ३६५ एकरवर आले. याचवेळी राज्यातील तुतीचे क्षेत्रही जवळपास दोन हजार एकरने घटून १७ हजार ८८३ एकरवर आले. 

२०१९-२० मध्ये तुती लावलेल्या शेतकऱ्यांना जानेवारी अखेरपर्यंत १६ लाख ३० हजार ४२५ अंडीपुंजचा पुरवठा केला. त्याद्वारे उत्पादकांनी ९२० .५९१ टन कोषाचे उत्पादन केले, ते गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. 

उत्पादन वाढण्याचा अंदाज

नोंदणीच्या ३० जानेवारी अखेरपर्यंतच्या मुदतीनंतर औरंगाबाद जिल्ह्यात  १६२८ एकर, जालना ९८८, बीड १८९६.५, उस्मानाबाद ८७१, लातूर १४४२, परभणी ५२०, हिंगोली ४२२, तर नांदेड जिल्ह्यात ६२५.५ एकर क्षेत्राचा समावेश आहे.  त्यामुळे आधीच्या क्षेत्रात नव्याने लागवडीची तयारी चाललेल्या क्षेत्राची भर पडून पुन्हा रेशीमकोष उत्पादनवाढीसाठी, याची मदत होण्याचा अंदाज आहे.  

तुतीच्या क्षेत्रात बीडची आघाडी 

मराठवाड्यात जानेवारी अखेरच्या तुती क्षेत्रानुसार बीडची आघाडी आहे. या जिल्ह्यात जानेवारी २०२० अखेरपर्यंत सर्वाधिक २६०३ एकर तुतीचे क्षेत्र होते. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात १७३१.५ एकर, औरगांबाद १७००, जालना १०३५, परभणी ८८२, हिंगोली ६६४, नांदेड ९६५, तर लातूर जिल्ह्यातील ७८५ एकर क्षेत्राचा समावेश आहे. अंडीपुंज पुरवठा व उत्पादनातही २०१९-२० मध्ये बीड जिल्ह्याचीच आघाडी राहिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...