Agriculture news in marathi Horn cancer in animals | Agrowon

जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोग

डॉ. आकाश जाधव, डॉ. राकेश चित्तोरा
मंगळवार, 23 जून 2020

शिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील मोठ्या जनावरांना होतो; परंतु वयस्कर जनावरातसुद्धा हा रोग आढळत आहे. कडक उन्हात शेतात विविध कामांसाठी वापरले जाणारे बैल या रोगास बळी पडतात. गाईमध्ये हा रोग तुलनेने कमी प्रमाणात होतो. तसेच म्हशीमध्ये हा रोग कमी प्रमाणात होतो.
 

शिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील मोठ्या जनावरांना होतो; परंतु वयस्कर जनावरातसुद्धा हा रोग आढळत आहे. कडक उन्हात शेतात विविध कामांसाठी वापरले जाणारे बैल या रोगास बळी पडतात. गाईमध्ये हा रोग तुलनेने कमी प्रमाणात होतो. तसेच म्हशीमध्ये हा रोग कमी प्रमाणात होतो.

शेतात उन्हात काम करीत असताना प्रखर सूर्यकिरणांमधील अतिनील किरणामुळे शिंगाचा कर्करोग होतो. बैलाच्या शिंगास रंग लावला जातो. या रंगातील विषारी पदार्थांमुळे शिंगामध्ये सतत जळजळ होते, त्यामुळे हा रोग होऊ शकतो. राज्यात कर्नाटकी बेंदूर, बैल पोळा या सणाच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंगे तासून त्यांना रंग लावतात. बऱ्याचदा जत्रा, जनावरांच्या बाजारामध्ये व्यापार व्यवसाय करणारे लोक बैलाची शिंगे तासून रंग लावतात. त्यांचा मुख्य उद्देश जनावरांचे वय लपवणे हा असतो. परंतु, या कारणामुळे जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होऊ शकतो.

कारणे 

 • शेती कामासाठी जुंपलेल्या बैलास शिंगाच्या पाठीमागच्या भागास सतत मानेवरील जू चा मार लागतो.
 • काही विषाणू या रोगासाठी कारणीभूत ठरतात.
 • वयस्कर जनावरांस हा रोग जास्त प्रमाणात होतो.
 • शिंगे आकर्षक दिसण्यासाठी तासली जातात, यामुळे शिंगाला इजा होऊन रोग होतो.
 • जनावरांचे शिंग हे बुडास जाड आणि टोकास निमुळते असते. शिंगाचा बाहेरील भाग हा टणक आवरणाने बनलेला असतो, तर आतील भाग पोकळ असून, अनियमित असतो. तो मस्तकाच्या हाडाला जोडलेला असतो. जनावरांच्या शिंगाचा आतील पोकळ भागात रोगाची सुरुवात होते. नंतर हा कर्करोग शिंगाचा पोकळ भाग पूर्णपणे व्यापून टाकतो. शिंगाच्या बुडासही तो पसरतो.

लक्षणे

 • शिंगास वेदना होतात. जनावर सतत डोके हलवते.
 • जनावर झाडास शिंग घासते.
 • कर्करोग झालेल्या शिंगावर हलके मारून पाहिल्यावर त्यातून भद् भद आवाज येतो. असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही.
 • ज्या बाजूच्या शिंगास कर्करोग झाला आहे त्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्राव येतो. असा स्राव शिंगाच्या बुडामधूनही येतो.
 • कर्करोग झालेले शिंग एका बाजूला झुकते .
 • रोगाचे प्रमाण जास्त असल्यास शिंग हलते थोड्याशा माराने गळून पडते.
 • शिंग तुटल्यावर त्याठिकाणी कोबीसारखी कर्करोगाची वाढ दिसते. रक्तस्राव होतो. अशा वाढीवर जिवाणूचा प्रादुर्भाव होतो. यात दुर्गंधी येते.
 • कर्करोगाच्या वाढीवर माश्या बसतात. असडी पडते.

असा ओळखा रोगाचा प्रसार 

 • शिंगाचा कर्करोग हा प्रामुख्याने लक्षणावरून उदा. शिंग वाकडे होणे, हलणे, नाकातून येणारा स्राव, शिंग घासणे आदीवरून केले जाते.
 • जनावराच्या शिंगाच्या ‘क्ष’ किरण तपासणीत शिंगाच्या आतील पोकळ भागात पेशींची वाढ दिसते. जी कर्करोग दर्शवते.
 • रोगाचे निश्चित निदान प्रयोगशाळेत कर्करोगाच्या वाढीच्या तपासणीवरून केले जाते.

उपचार

 • रोगाची लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाशी संपर्क साधून उपचार करावेत.
 • शिंगावर शस्त्रक्रिया करून शिंग बुडातून कर्करोगासहित काढले जाते. या रोगाचा इतर अवयवात प्रादुर्भाव झाल्यावर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही.
 • शिंगाचा कर्करोगावर पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

कर्करोग कसा टाळावा

 • कडक उन्हात बैलांना काम देऊ नये. त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय करावी.
 • शिंगे तासू नये, शिंगांना रंग लावू नये. बैलांना शेतात काम करताना मानेवरचे जू सतत शिंगावर आदळू नये म्हणून रबराचे आवरण जू वर लावावे. शिंगाच्या बुडामध्ये तेल लावावे.

संपर्क- डॉ. आकाश जाधव, ९५५२५५२०४८
(लेखक ॲनिमल राहत, सोलापूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत)


इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...