कृषी हवामान बदल संशोधन केंद्राचे घोडे अडलेलेच

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापनेचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे.
The horses of the Agricultural Climate Change Research Center are stuck
The horses of the Agricultural Climate Change Research Center are stuck

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापनेचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने गतवर्षी त्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. त्यावर गांभीर्याने विचार केला गेला नाही. राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली नसल्यामुळे हवामान बदल संशोधन केंद्राचे घोडे अडलेले आहे.

मराठवाड्यात जिरायती शेतीचे क्षेत्र मोठे आहे. या भागातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढते तापमान या नैसर्गिक संकटांना तोंड देत शेती करावी लागते. ग्रामस्तरावर शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर हवामान सल्ला पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील सध्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. मराठवाडा विभागासाठी स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राची गरज लक्षात घेऊन पाच वर्षांपूर्वी परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापनेचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे सादर केला होता. त्यास २०२१ फेब्रुवारी महिन्यात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र त्यापुढे त्यात प्रगती दिसत नाही. 

राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा परभणी कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच हवामान बदल संशोधन केंद्रास मंजुरी देऊन निधीची तरतूद आवश्यक होती. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी या केंद्रासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. 

हवामान बदल संशोधन केंद्राची उद्दिष्टे 

  • मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर (तालुका-मंडळ) हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भू -हवामान वेधशाळा आणि स्वयंचलित हवामान वेधशाळा कार्यान्वित करणे. 
  • प्रत्येक जिल्ह्यातील हवामान बदलांचा अभ्यास करणे. सूक्ष्म वातावरणीय विभागवार अथवा स्थानिक पातळीवर (तालुका-मंडळ) पीकपद्धती विकसित करणे. दुष्काळप्रवण क्षेत्राचे निकष गाव पातळीवर तपासणे. त्यांची नव्याने मांडणी करणे. आपत्कालीन पीक नियोजन सुचविणे, हवामान पीक कॅलेंडर तयार करणे. 
  • प्रत्येक गावात कृषी हवामान सल्ला पत्रिका पोहोचवणे. 
  • स्थानिकरीत्या पाण्याचे बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन काढणे त्यावर आधारित मुख्य पिकांकरिता वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज काढणे, शेतकऱ्यांना पीक पाणी व्यवस्थापन वेळापत्रक देणे. 
  • दुष्काळ, पावसाचा खंड, अतिवृष्टी, गारपीट, वादळ, धुके, तापमान, उष्णतेची लाट, थंडीची लाट यामध्ये सहनशील पिकांच्या वाणांची चाचणी, शिफारस, नवीन वाणांची निर्मिती, पीक व्यवस्थापन पद्धती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. 
  • कीड व रोग अनुमान प्रारूप काढणे, स्थानिक पातळीवर पीकनिहाय कीड व रोगाचे अनुमान काढणे, मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज देणे. 
  • हवामान आधारित पीक, फळपिकविमा योजनेसाठी उपयुक्त माहिती शासनास उपलब्ध करून देणे. 
  • शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगांना सूक्ष्म हवामान विभागानुसार मार्गदर्शन करून रोजगार निर्मितीसाठी हातभार लावणे. 
  • नैसर्गिक संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी संशोधन तसेच संयंत्रे उपलब्ध करून देणे. ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, विस्तार कार्य करणे.
  • बदलत्या हवामान परिस्थितीत मराठवाड्यातील वातावरणात तग धरणारे वाण, पीक पद्धतीवर संशोधनासाठी या केंद्राची गरज आहे. त्यावर गांभीर्याने विचार व्हावा प्रस्तावास मंजुरी द्यावी. पुरेसा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा.   - डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com