लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग लागवड

horticulture are planted on two thousand hectares in Latur region
horticulture are planted on two thousand hectares in Latur region

नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये सन २०१९-२० जानेवारी अखेरपर्यंत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पोकरा या तीन योजनांची मिळून एकूण २ हजार १२२.१२ हेक्टरवर फळबागेची लागवड झाली आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गंत  सन २०१९-२० साठी लातूर विभागात २३ कोटी १८ लाख १४ हजार रुपयांची तरतूद आहे. जानेवारी अखेरपर्यंत २२ हजार ६७९ शेतकऱ्यांनी २४ हजार ३६१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले. पूर्वसंमती तसेच प्रशासकीय मंजुरीनंतर २ हजार २१३ शेतकऱ्यांनी २ हजार ११४.७९ हेक्टरवर फळबाग लागवड केली. या योजनेतंर्गंत आजवर ४ कोटी १६ लाख २१ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गंत ६ हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचा लक्षांक आहे. त्यासाठी २ हजार ६९ शेतकऱ्यांनी १ हजार ५९२.३६ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी १ हजार ७१२ शेतकऱ्यांना १ हजार ३०७.३१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली. एकूण १ हजार ४२४ शेतकऱ्यांना १ हजार २९.९४ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ६२८ शेतकऱ्यांनी ३९०.३ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे.

या योजनेंतर्गंत १ कोटी ३७ लाख ८ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गंत २४३.४१ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.

जिल्हानिहाय फळबाग लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)

जिल्हा भाऊसाहेब फुंडकर योजना मनरेगा  पोकरा  एकूण
परभणी ५८४.१७  ५५.४०  ८३.६२ ७२३.१९
हिंगोली २५३ १३५.४०  ८३.७९  ४७२.१९
नांदेड २६७.३६  १०७.६५  ००० ३७५.०१
लातूर  १८५.६८ ३८.५०  ८  २३२.१८
उस्मानाबाद  १९८.२० ५३.३५ ६८  ३१९.५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com