agriculture news in Marathi horticulture, bamboo and tuti planting from POCRA Maharashtra | Agrowon

‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती लागवडीस प्रोत्साहन 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) फळबाग, वनशेती, बांबू व तुती लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे.

औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) फळबाग, वनशेती, बांबू व तुती लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पामध्ये वातावरणातील कर्ब वायूचे स्थिरीकरण करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. 

राज्य शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अशा एकूण १५ जिल्ह्यांमध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राबविला जात आहे. गावशिवारात वृक्षांची व फळबागांची लागवड त्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल होऊन, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती बरोबरच हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कर्ब वायूंचे स्थिरीकरण करण्यास मदत होते. अवेळी पाऊस व दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण यामुळे करता येणे शक्य आहे. 

ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक तसेच ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेले शेतकरी यासाठी पात्र असतील. वनशेतीसाठी वृक्ष लागवड व बांबू लागवड ही सार्वजनिक क्षेत्रावर (ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर) ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या क्षेत्रावर लागवड करता येईल. 

असे आहे अर्थसहाय्य 
या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर वनशेती, वृक्ष लागवड , बांबू लागवड, फळबाग लागवड तसेच रेशीम उद्योगासाठी तुती लागवड करण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देण्यात येते. तसेच गावातील सार्वजनिक जमिनीवर वनशेती, वृक्ष लागवड व बांबू लागवड करण्यासाठी देखील १०० टक्के अर्थसाहाय्य देण्यात येते. 

याची करता येईल लागवड 
वनशेती पद्धतीमध्ये साग, ऐन, शिसम, मोह, जांभूळ, खैर, शिवन, बेहेडा, धावडा इ. स्थानिक परिस्थितीत अनुकूल असणाऱ्या प्रजाती. बांबू लागवड हा स्वतंत्र घटक आहे. तर आंबा, डाळिंब, पेरु, सीताफळ, आवळा, कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी आदी फळझाडांची लागवड करता येणार आहे. 

वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के व २ ते ५ हेक्टर जमीनधारकांना ६५ टक्के. तर वृक्ष लागवड व बांबू लागवड ही सार्वजनिक क्षेत्रावर (ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर) लागवडीकरिता १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तुती रोपे तयार करणे व तुती लागवड -रेशीम उद्योग या घटकासाठी दिलेल्या मापदंडानुसार सामान्य प्रवर्गातील लाभार्थींना ७५ टक्के व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती करिता ९० टक्के अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. 

प्रतिक्रिया
प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावातील इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahapocra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच अर्ज करण्यासाठी, गाव समूहातील इच्छुक शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून घटक निहाय अर्ज व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत किंवा गावाच्या समूह साहाय्यक अथवा कृषी साहाय्यकाशी संपर्क साधावा. 
- विकासचंद्र रस्तोगी, प्रकल्प संचालक, पोकरा 


इतर अॅग्रो विशेष
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...